Jalna : जालन्यात आठ दिवस छापेमारी, नोटा मोजता मोजता अधिकारी आजारी; इतका पैसा सापडला की नोटांची भिंतच तयार झाली!

Jalna : आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केली. तब्बल आठ दिवस ही कारवाई केली. दिवस आणि रात्र ही करावाई सुरू होती. कारवाईसाठी आयकर विभागाच्या नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली.

Jalna : जालन्यात आठ दिवस छापेमारी, नोटा मोजता मोजता अधिकारी आजारी; इतका पैसा सापडला की नोटांची भिंतच तयार झाली!
जालन्यात आठ दिवस छापेमारी, नोटा मोजता मोजता अधिकारी आजारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:46 AM

जालना: जालन्यातील (Jalna) स्टील कारखानदारांच्या घर, कार्यालय आणि फार्म हाऊसवर टाकण्यात आलेल्या छापेमारीतून आयकर विभागाच्या हाती 390 कोटींचे घबाड सापडले आहे. यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे मोती आदी कुबेराचा खजिनाच सापडला आहे. जालन्यातील स्टील कंपन्यांकडून (steel company in jalna) कर बुडवला जात असल्याची माहिती आयकर विभागाला (income tax raid) मिळाली होती. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी वऱ्हाडी बनून आले आणि त्यांनी या कारखान्यांवर छापेमारी केली. तब्बल आठ दिवस ही छापेमारी सुरू होती. काल तर सकाळी 11 वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत नोटा मोजण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे नोटा मोजता मोजता अधिकारी थकले आणि आजारी पडले. पण नोटा काही संपत नव्हत्या. या छापेमारीत एवढ्या नोटा सापडल्या की नोटांची एक अख्खी भिंतच तयार झाली. त्यामुळे जालन्यातील या महा खजिन्याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.

वऱ्हाडी बनून आले आणि बँड वाजवला

आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केली. तब्बल आठ दिवस ही कारवाई केली. दिवस आणि रात्र ही करावाई सुरू होती. कारवाईसाठी आयकर विभागाच्या नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली. चार स्टील कारखानदारांच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर करण्यात आलेल्या या छापेमारीसाठी 260 कर्मचारी, 100 गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आधी आयकर विभागाचे अधिकारी वऱ्हाडी बनून आले. त्यांनी आपल्या गाडीवर राहुल वेड्स अंजली असं लिहिलं होतं. त्यामुळे लग्नाचं वऱ्हाड आल्याचं सर्वांना वाटलं. मात्र, नंतर अधिकाऱ्यांनी आपली ओळखपत्रं दाखवताच कारखानदारांचे धाबे दणाणले.

हे सुद्धा वाचा

मोर्चा फार्म हाऊसकडे वळताच घबाड सापडलं

आधी आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारखाने आणि कारखानदारांच्या घर तसेच कार्यालयावर छापे मारले. पण तिथे काही सापडलं नाही. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारखानदारांच्या फार्म हाऊसवर मोर्चा वळवला. त्यावेळी त्यांच्या हाती कुबेराचा खजिनाच लागला. फार्म हाऊसमध्ये कपाटाखाली, बिछान्यात आणि अडगळीत पैशाच्या पिशव्याच्या पिशव्याच सापडल्या. सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, नाणी आणि हिरेही सापडले. या छापेमारीत सापडलेल्या सोन्याच्या 32 किलो दागिन्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी घर आणि कार्यालयातून शेती, जमीन आणि बंगल्यासह इतर ठेवी आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

नोटांची भिंतच तयार झाली

आठ दिवस चाललेल्या या कारवाईत फार्म हाऊसमध्ये नोटांचे बंडल मोठ्या प्रमाणावर सापडले. 58 कोटींची रोकड 35 पिशव्यात भरली होती. त्यामुळे या सर्व नोटा एकत्र करून त्या स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आल्या. काल सकाळी 11 वाजता सुरू झालेली मोजणी रात्री 1 वाजता पूर्ण झाली. तब्बल 13 तास ही मोजणी सुरू होती. आठ दिवसांची कारवाई आणि तब्बल 13 तास नोटांची मोजणी यामुळे अधिकारीही आजारी पडले. नोटा एवढ्या होत्या की त्या एकावर एक ठेवल्या असता नोटांची भिंतच तयार झाली. त्यामुळे सर्वच चक्रावून गेले.

औरंगाबादेतही छापे मारी

त्यानंतर औरंगाबादमध्येही तीन ठिकाणी छापे मारण्यता आले आहेत. स्टील कारखान्यातून ही मालमत्ता औरंगाबादेत आली. औरंगाबादच्या काही कॅटरर्स आणि बांधकाम व्यावसायिकांनी कर बुडवलेला हा पैसा रोखीत व्यवहारात आणला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चार स्टिल कारखानदारांनी कोट्यवधी रुपायांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले. पण कर भरला नव्हता. त्यांनी रेकॉर्डवर हे उत्पन्न आणले नव्हते. हा सर्व पैसा रोखीत व्यवहारात आणला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.