Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज-उद्या औरंगाबादेत, कुठे मेळावे, कोणत्या बैठका, वाचा सविस्तर!
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात सर्वांचे लक्ष आहे ते सिल्लोडमधील मेळाव्याकडे. सिल्लोड मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ. मुख्यमंत्र्यांच्या येथील मेळाव्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
औरंगाबादः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारपासून राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज आणि उद्या एकनाथ शिंदे औरंगाबादच्या (Aurangabad visit) दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबादमधील तब्बल पाच आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे येथील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी नुकताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला. त्यामुळे जनतेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल एक सहानुभूतीचे वातावरण तयार झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील राज्यभरातील दौरा आयोजित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात सर्वांचे लक्ष आहे ते सिल्लोडमधील मेळाव्याकडे. सिल्लोड मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ. मुख्यमंत्र्यांच्या येथील मेळाव्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात आणखी कोण-कोणते कार्यक्रम आहेत हे पाहुयात….
- शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री वैजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचतील.
- शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता शिवसेनेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येथील आमदार रमेश बोरनारे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
- रात्री 8वाजता मुख्यमंत्री वैजापूरहून औरंगाबाद शहरात येतील.
- रात्री 10 वाजता शासकीय विश्रामगृहात मुक्काम असेल.
- रविवारी सकाळी 10 ते 11.30 वाजेप्रयंत पाऊस, अतिवृष्टी पिक पाण्यासंदर्भात आढावा घेतला जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडेल.
- सकाळी 11.30 ते 12.00 वाजेपर्यंत औरंगाबादेत पत्रकार परिषद असेल.
- दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री सिल्लोडकडे रवाना होतील.
- दुपारी1.30 ते 2.15 वाजता सिल्लोड येथे बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा पार पडेल.
- दुपारी 2.30 वाजता अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी भेट देतील.
- त्यानंतर नगरपालिका इमारतीचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण, प्रवेशद्वाराचे लोकार्पण, नॅशनल सहकारी सूत गिरणीचे भूमिपूजन होईल.
- दुपारी 2.45 ते 4.15 वाजेपर्यंत शिवसेनेची जाहीर सभा सिल्लोड येथील नगर परिषद मैदानावर घेतली जाईल.
- दुपारी 4.15 वाजता मुख्यमंत्री सिल्लोडहून औरंगाबादेत येतील.
- 6.00 ते 6.15 पर्यंत आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मतदार संघातील हर्सूल नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.
- 7.20 वाजता भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.
- संध्याकाळी 7.40 वाजता आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला भेट देतील.
- संध्याकाळी 8.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन, शीख समाजाच्या गुरुद्वाऱ्याला भेट देतील.