Aurangabad | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगबाद प्रशासनाचं मिशन पाणी! नवी जलवाहिनी टाकण्यास सुरुवात, कंत्राटदाराला किती दिवसांची डेडलाइन?

औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे काम सुरु आहे.

Aurangabad | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगबाद प्रशासनाचं मिशन पाणी! नवी जलवाहिनी टाकण्यास सुरुवात, कंत्राटदाराला किती दिवसांची डेडलाइन?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 9:52 AM

औरंगाबादः उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेपूर्वी औरंगाबाद महापालिका (Aurangabad municipal Corporation) प्रशासनातर्फे शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे हर प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लावली जात आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नागरिकांचा कोणत्याही स्वरुपातील रोष ओढवून घ्यायचा नाही, याची काळजीही प्रशासनातर्फे घेतली जात आहे. शहरातील सध्या अस्तित्वात असलेली जुनी जलवाहिनी (Water pipeline) जीर्ण झाली आहे. तिच्या डागडुजीची योग्य काळजी घेतली जात आहे तर इकडे संथ गतीने सुरु असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकण्याचाही श्रीगणेशा करण्यात आला. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या यंत्राचे पूजन करण्यात आले आणि कामाला सुरुवात करण्यात आली.

2400 मिमी व्यासाचे पाइप

औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे काम सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 2400 मिमी व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. हे विशाल पाइप नक्षत्रवाडी येथील डोंगरावरच तयार करण्यात आले आहेत. आता हे पाइप टाकण्यास सुरुवात झाली आहे. पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पाईप टाकले जात असल्याचे कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आणखी काय हालचाली?

  •  नवी पाणीपुरवठा योजनेचं कंत्राट दिलेल्या जीव्हीपीआर कंपनीने जर 10 ते 15 वेल्डिंग मशीन्स, 200 कामगार जर कंत्राटदाराने फॅक्टरीत ठेवले, तरच जलवाहिनी उत्पादनाचे काम निर्धारीत काळात पूर्ण होईल. त्यामुळे कंपनीला मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांची डेडलाइन दिली आहे.
  •  सध्याच्या घडीला शहराची तहान भागवणाऱ्या 700 मिमी ची जुनी जलवाहिनी बदलून त्या ठिकाणी तातडीने 800 ते 1 हजार मिमीची नवीन जलवाहिनी टाकण्याची बूस्टर योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचं अंदाजपत्रक तयार करून तिला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करण्यासाठी मोठा जॅकवेल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजीप्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्यांदा केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीशिवाय कामाला सुरुवात होणार नाही.
  • हर्सूल तलावातून 5 एमएलडी अतिरिक्त पाणी घेण्यासाठी सोमवारी रात्री उशीरापर्यंत चाचणी घेण्याचं काम सुरु होतं. ही चाचणी जवळपास यशस्वी झाली असून मंगळवारी 10 एमएमडी पाणी शहराला मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.