महाराज काय फक्त मुसलमानांना कापायचे? शिवव्याख्याता आणि भाजप खासदारात जुंपली

तुषार उमाळे बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखविण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे समजावत असताना खासदार अनिल बोंडे यांनी उभं होऊन हे शहाणपण बंद कर, मूर्ख आहे का? असा सवाल केला. त्यानंतर मंचावर गोंधळ उडाला.

महाराज काय फक्त मुसलमानांना कापायचे? शिवव्याख्याता आणि भाजप खासदारात जुंपली
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 6:14 PM

अमरावती : शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करण्यात कोणताही राजकीय पक्ष मागे राहिलेला नाही, शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत वाद निर्माण केले जात आहेत, तर शिवाजी महाराज यांचं चुकीचं वर्णन केल्यावरही वाद होत राहतात, छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक नाव आहे की, ज्यामुळे वाद होतात, पण त्यांचं नाव इतिहासात एवढं मोठं आहे की, असे वाद त्यांच्यासमोर तोकडेच ठरतात. अमरावतीत 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंतीला आयोजित केलेल्या व्य़ाख्यान मालिकेत असाच वाद समोर आला आहे. यात भाजपाचे खासदार आणि शिव व्याख्याता एकमेकांसमोर उभे ठाकले, तसेच एकमेकांशी कारे तुरे देखील वर आले. पाहा कोण कुणाला काय म्हणालं.

शिवजयंती निमित्त अमरावतीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून तुषार उमाळे यांना बोलवण्यात आलं. यावेळी मंचावर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) देखील उपस्थित होते. तुषार उमाळे (Tushar Umale) बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखविण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे समजावत असताना खासदार अनिल बोंडे यांनी उभं होऊन हे शहाणपण बंद कर, मूर्ख आहे का? असं उच्चारण केलं. यावेळी मंचावर असलेले मान्यवर उठून गेलेत. दरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय. सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

“महाराजांना कोणत्या पद्धतीने प्रेजेंट करायचं हेच आमच्या लोकांना कळलेलं नाही. शिवाजी महाराज उठले की, माँ साहेब सांगायचे, महाराज नाष्टा करायचा आहे, दोन मुसलमान कापून या. महाराज दोन मुसलमान कापून आणले. मग नाष्टा झाला. दुपारचे बारा वाजले. आता जेवायची वेळ झालीय. महाराज मुसलमान कापून या. गेले, चार मुसलमान कापून आले आणि जेवायला आले. आता संध्याकाळ झाली, सहा तरी होऊन जाऊद्या. महाराज गेले आणि सहा मुसलमान खपाखप कापून आले. महाराजांना दुसरा धंदाच नव्हता. उठलं की फक्त मुसलमानच मारायचे. महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता अशी जणू काही…”, असं भाषण तुषार उमाळे करत होते.

हे सुद्धा वाचा

अनिल बोंडे संतापले, दोघांमध्ये हमरीतुमरी

तुषार उमाळे यांचं हे भाषण सुरु असताना मंचावर बसलेले अनिल बोंडे संतापात म्हणाले, “ए शान्या, मुर्ख आहे का?”, त्यानंतर उमाळे त्यांना भर मंचावर तुम्ही मुर्ख आहेत का? असा उलट प्रश्न विचारला. यानंतर कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीचा आवाज येतो. अनिल बोंडे जागेवरुन उठतात. मंचावरची सर्व मंडळी उठते. नंतर मंचावर गोंधळ उडतो. अखेर पोलीस आणि इतरांच्या मदतीने गोंधळ निवळतो आणि पुन्हा भाषणाला सुरुवात होते.

तुषार उमाळे यांनी अनिल बोंडे यांना भाषणातून ठणकावलं

यावेळी शिवव्याख्याते तुषार उमाळे आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात. ही अभिव्यक्तीची गळचेपी कदापी सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणार, असं तुषार उमाळे यांनी ठणकावून सांगितलं. “तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्हाला वडिलधारी आहात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणणार”, असंही ते यावेळी म्हणाले.

“काही सौम्य नाही. जे आहे ते माझे विचार आहेत. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी ऐकायचं, ज्यांना नाही पटत त्यांनी निघून जायचं. मलाही हरकत नाही. मी निमंत्रित पाहुणा आहे. तुम्ही सुद्धा आहात. मी तुमचा सन्मान करतो. ज्येष्ठ आहात. वडिलधारी आहात, आमच्या वडिलांसमान आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला आरे कारे करणार आणि आमच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणार. अजिबात नाही”, असं तुषार उमाळे म्हणाले.

“महाराज कोणत्याही जाती-धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन सगळ्यांचं स्वराज्य स्थापन केलं. आपले मराठी जेव्हा लढायला जायचे तेव्हा कोणत्या जातीचा आला ते विचारायचे नाही. सगळेजण एकच म्हणायचे, अरे आ गये रे मऱ्हाठे, आम्ही शिवाजी महाराजांचे मराठे आहोत”, अशा शब्दांत तुषार उमाळे यांनी ठणकावून सांगितलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.