पी हळद…हो गोरी…वर्षानुवर्ष ती काळी, पण पोरं गोरी, चंद्रपुरात नक्की घडलं काय?
जेव्हा ही पिलं, शेतकऱ्याने पाहिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ही दोन्हीही पिलं अगदी पांढरी शुभ्र होती.
चंद्रपूर: पी हळद आणि हो गोरी..आपल्याकडे ही म्हण सर्रास वापरली जाते. तूप खाल्ल्याने लगेच काही रुप येत नाही. पण, कधी कधी अशा घटना घडतात, की ज्या तुम्हाला म्हणींचे अर्थ बदलवतात. असे व्हिडीओ इंटरनेटवर (Viral Video) लगेच व्हायरल होत असतात. शेती आणि शेतकऱ्यांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे चंद्रपुरातला. (Chandrapur Buffelo) इथं चक्क एका म्हशीने 2 पांढऱ्या रेडकूंना (buffalo gave birth to white calves) जन्म दिला आहे. म्हैस काळी असली तरी दोन्ही पिलं मात्र एकदम गोरी आहेत.
संत नगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात ही घटना घडली आहे. या गावातील संजय येलमुले यांच्याकडे ही म्हैस आहे. काही दिवसांपासून ही म्हैश गरोदर होती, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या म्हशीने येलमुले कुटुंबाला आनंदाची बातमी दिली. सकाळीच या म्हशीला कळा सुरु झाल्या, आणि काहीच वेळात म्हशीने या 2 गोंडस रेडकूंना जन्म दिला.
मात्र, जेव्हा ही पिलं, येलमुले यांनी पाहिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ही दोन्हीही पिलं अगदी पांढरी शुभ्र होती. येलमुले यांना आधी काही कळालं नाही, नंतर ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली, आणि गावकरी या पिलांना पाहायला येऊ लागले.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
आई आणि पिलं दोघंही सुखरुप आहेत. दोन्ही पिलं आता आईचं दूध पित आहेत, डॉक्टरांनीही या पिलांची तपासणी केली आहे. नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग पांढरा आहे, आणि याच दिवशी म्हशीने पांढऱ्या शुभ्र पिलांना जन्म दिल्याने चांगला योगायोग जुळला आहे.
या पिलांना पाहण्यासाठी आता ग्रामस्थ येलमुले यांच्या घरी येत आहेत. शेकडोतून एखाद्याच वेळी म्हशीला अशी पिलं होतात. हार्मोन्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्येमुळे प्राण्यांमध्ये असे बदल होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेकदा अशाच प्रकारे बिबट्यांच्या अंगावरील चट्टे काळे पडतात, आणि ते पूर्ण काळे होतात. ज्याला ब्लॅक पँथर म्हटलं जातं. तर कावळ्यामध्येही ही समस्या झाल्यानंतर कावळ्यांचे पंख पांढरे होतात.
ही एक समस्य़ा असली तरी अनेकांना हे खूप वेगळी घटना वाटते. काही प्राण्यांमध्ये जन्मपासून ही समस्या दिसते, मात्र काही काळानंतर ते त्यांच्या पहिल्या स्वरुपात येतात. तर काहींमध्ये ही समस्या आयुष्यभर राहते.