हवेत लांब आणि घनदाट केस ? मग हेअरवॉशसाठी करा या नैसर्गिक गोष्टींचा वापर
Natural Shampoo For Hair Wash : केस धुण्यासाठी लोकं अनेक प्रकारच्या शांपूचा वापर करतात. पण केमिकलयुक्त शांपू वापरल्याने केसांचे अपरिमित नुकसान होऊ शकते. काही नैसर्गिक पदार्थांच्या वापराने केस धुतल्यास ते लांब, काळे , घनदाट व चमकदार होण्यास मदत मिळते.
Natural Shampoo For Hair Wash : केसांची चांगली निगा (hair care) राखण्यासाठी, अनेक लोक विविध हेअर केअर प्रॉडक्ट्सची मदत घेतात. तर काही जण विविध शांपूचा (shampoo) वापर करतात. पण त्यामुळे अपेक्षित फरक दिसून येतोच असे नाही. तसेच केमिकलयुक्त शांपू वापरल्याने केसांचे नुकसान होते, ते तुटतात आणि गळतातही.
अशा वेळी केस धुण्यासाठी तुम्ही काही घरगुती गोष्टी वापरू शकता. या नैसर्गिक पदार्थांच्या वापराने फायदा होऊ शकतो. तसेच काही साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणामही होत नाहीत. त्यामुळे आपले केस लांब, काळे , घनदाट व चमकदार होण्यास मदत मिळते.
हे नैसर्गिक पदार्थ कोणते ते जाणून घेऊया
मेथीच्या बिया
मेथीच्या बियांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. केस धुण्यासाठी चार ते पाच चमचे मेथी दाणे चार तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर ते पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढा आणि त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा मध मिसळा. त्यानंतर ही पेस्ट केसांवर लावून तासभर ठेवा आणि नंतर केस धुवून टाका.
मुलतानी माती
केस धुण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा देखील वापर करू शकता. एका भांड्यात थोडीशी मुलतानी माती घेऊन त्यात पाणी घालून ती चार-पाच तास भिजवून ठेवावी. नंतर ही पेस्ट केसांवर लावून तासभर तशीच ठेवावी. त्यानंतर केसांना मालिश करून, ते जरा चोळून धुवावेत आणि साध्या पाण्याने स्वच्छ करावेत.
दही व लिंबू
हेअर वॉश करण्यासाठी तुम्ही दही आणि लिंबू यांचाही वापर करू शकता. हे उत्तम कंडिशनर म्हणून काम करते. यासाठी दोन-तीन चमचे दह्यात तेवढाच लिंबाचा रस मिसळा. नंतर हे मिश्रण केसांना लावून अर्धा तास तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
रीठा
केसांसाठी रीठ्याचाही वापर करू शकता. सर्वप्रथम रीठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी तो मिक्सरमधून बारीक करून त्याची पातळ पेस्ट बनवा.नंतर खोबरेल तेलामध्ये एक चमचा भृंगराज टाकून ते उकळावे व कोमट झाल्यावर केसांना लावावे. ते तसेच दोन तास ठेवावे. त्यानंतर रीठाच्या द्रावणाने केस स्वच्छ धुवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)