Facial Hair : चेहऱ्यावरच्या नकोशा केसांमुळे हैराण ? या घरगुती उपायांचा होईल फायदा
अनेक महिलांच्या चेहऱ्यावर छोटे-छोटे, नकोसे केस असतात. ज्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते. ते हटवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
How to get rid of Facial Hair : चेहऱ्यावर असणाऱ्या छोट्या-छोट्या, नकोशा केसांमुळे ( facial hair ) अनेक महिला हैराण असतात. ते केस हटवण्यासाठी काही जणी वॅक्सिंगचा तर काही जणी थ्रेडिंगची मदत घेतात. तर काही महिला लेझर टेक्निकचाही उपयोग करून ते केस हटवतात. पण हे प्रत्येकालाच शक्यन नसते, काही उपाय वेदनादायक तर काही खूप खर्चिक. शरीरातील हार्मान लेव्हल असंतुलित झाली की चेहऱ्यावर केस येतात. ते थांबवण्यासाठी खाण्या-पिण्यात बदल करणे महत्वाचे असते. तसेच काही घरगुती उपायांच्या मदतीने (home remedies) चेहऱ्यावरचे केस हटवता येतात.
स्पिअरमिंट चहा
स्पिअरमिंट हा एक प्रकारचा पुदिना असतो, त्याच्या चहाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील केस हटवण्यास मदत होते. नियमित सेवनाने फरक पडू शकतो.
दालचीनीचे पाणी
पाण्यात दालचिनीचा तुकडा टाकून ते उकळावे. गार झाल्यावर हे पाणी प्यावे. यामुळे चेहऱ्यावरील नकोशा केसांपासून सुटका मिळते.
स्पेशल चहा
पाण्यात ज्येष्ठमध, दालचिनी आणि जायफळ उकळून आईस टी बनवा आणि झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करा. यामुळे नको असलेल्या केसांची वाढ थांबेल.
अक्रोड
अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण किंवा तल्लख होतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यामुळे चेहऱ्यावरील केसांची वाढही कमी होते. भिजवलेले अक्रोड खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. याच्या रोजच्या सेवनाने चेहऱ्यावरील नकोशा केसांपासून सुटका होते.
जेवणात या गोष्टींचा समावेश करण्यासोबतच रोज 30 मिनिटे चालावे आणि व्यायाम करावा, यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि हार्मोन्सची पातळी वाढणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)