सुट्टयांमध्ये फिरायला कुठे जायचं प्रश्न पडतोय?, या आहेत 5 जागा तुम्हालाही वाटेल पैसा वसुल!
काहीजणांना नेमकं फिरायला जायचं कुठे असा प्रश्न पडतो. तर अशांसाठी काही बेस्ट ठिकाणे आहोत. जिथे तुम्ही बिनधास्त फिरायला जाऊ शकता.
सध्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत फिरायला जायचा प्लॅन करतातच. काहीजण त्यांच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जातात. पण काहीजणांना नेमकं फिरायला जायचं कुठे असा प्रश्न पडतो. तर अशाच लोकांसाठी आज आम्ही काही अशी बेस्ट ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही बिनधास्त फिरायला जाऊ शकता. तेही एकदा तुम्हाला परवडेल या बजेटमध्ये.
कसोल – कसोल हे बेस्ट ठिकाण हिमाचलमध्ये आहे. कसोल हे पार्वती नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे हे ठिकाण आकर्षित करते. जर तुम्हाला ट्रेकिंग करायला आवडत असेल तर कसोल हे बेस्ट ठिकाण आहे. तसेच निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण खूप चांगले आहे.
कोडाइकनाल – कोडाइकनाल हे देखील ट्रॅव्हल प्रेमींसाठी बेस्ट ठिकाण आहे. कोडाइकनालमध्ये ढगांमध्ये लपलेले पर्वत आणि सुंदर तलाव तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तसेच येथील अनेक स्वादिष्ट पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये राहू शकता.
अलेप्पी – जर तुम्हाला बीचवर जायला आवडत असेल तर अल्लेपी हे ठिकाण बेस्ट आहे. अल्लेपी हे ठिकाण सुंदर असा बीच, बॅकवॉटर आणि लैगूनसाठी फेमस आहे. तसेच येथे तुम्हाला पारंपारिक मंदिरे पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अल्लेपी हे ठिकाण बोट शर्यतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही येथे बिनधास्त फिरायला जाऊ शकता. तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल.
दार्जिलिंग – दार्जिलिंग हे ठिकाण पर्यटन प्रेमींच्या आवडतं ठिकाण आहे. दार्जिलिंग चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही टॉय ट्रेनमध्ये बसण्याचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण तुम्हाच्या बजेटला परवडेल असे आहे. त्यामुळे या सुंदर ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. हि ट्रिप तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.