झोपण्यापूर्वी लहान मुलांना हे पदार्थ अजीबात खायला देऊ नका नाही तर मुलं रात्रभर झोपणार नाहीत

लहान मुल एकाच वेळेस पोटभर, भरपूर खाऊ शकत नाहीत. वाढत्या वयाच्या मुलांना थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असते. त्यामुळे ते जोपर्यंत जागे असतात, तोपर्यंत सतत काही ना काही खातच असतात. मात्र रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी काही ठराविक पदार्थ खायला देऊ नका अन्यथा त्यांना रात्रभर झोप येणार नाही.

झोपण्यापूर्वी लहान मुलांना हे पदार्थ अजीबात खायला देऊ नका नाही तर मुलं रात्रभर झोपणार नाहीत
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:16 PM

लहान मुल एकाच वेळेस पोटभर, भरपूर खाऊ शकत नाहीत. वाढतं वय असल्यामुळे त्यांना थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असते. त्यामुळे मुलं जोपर्यंत जागी असतात, तोपर्यंत सतत काही ना काही खातच असतात. मात्र रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी काही ठराविक पदार्थ खायला देऊ नका (do not give these food items) अन्यथा त्यांना रात्रभर (sleep will affect) झोप येणार नाही. रात्री झोप नीट झाली नाही तर सकाळी उठायला उशीर होतो आणि मग दिवसभराचं सगळं गणितच बिघडतं. अपूर्ण झोपेमुळे मुलांचं शाळेतही नीट लक्ष लागत नाही, अभ्यास धड होत नाही, चिडचिड होत राहते. त्यामुळे त्यांची रात्रीची झोप नीट, शांत होणे (sound sleep) गरजेचे आहे. रात्री काही ठराविक पदार्थ खाल्यास झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो , म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ पदार्थ मुलांना (avoid eating these food items before sleeping) बिलकूल देऊ नका.

कॅफेन

कॅफेनमुळे झोप उडते आणि ते शरीरात बराच काळ साठून राहते. संध्याकाळी 1 कप कॉफी प्यायल्यामुळेही लहान मुलांना रात्री झोप लागण्यात अडचण येऊ शकते. चहा, कॉफी, चॉकलेट, ग्रॅनोला बार, एनर्जी ड्रिंक, सोडा इत्यादी पदार्थांमध्ये कॅफेन असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी किमान 7 ते 8 तास आधी या पदार्थांचे सेवन करू नये आणि मुलांनाही देऊ नये.

चीज

लहान मुलांना पास्ता, बर्ग, पिझ्झा किंवा सँडविचसारखे पदार्थ खूप आवडतात. त्यामध्ये चीज घालून खाणे तर त्यांना अतिशय आवडते. रात्री झोपण्यापूर्वी चीजचे सेवन करू नये कारण त्यामध्ये टायरॅमिन असते. हे रसायन मेंदूतील उत्तेजक द्रव्ये रिलीज करते, ज्यामुळे मेंदू सतर्क आणि जागृत राहतो, त्यामुळे झोप लागणे कठीण होते. चीजसह पॅपरोनी, नट्स, ॲव्हकॅडो, सोया सॉस आणि रेड वाइन यामध्ये टायरॅमिन असते.

काही ठराविक भाज्या

काही भाज्या या रात्रीपेक्षा दुपारच्या जेवणात खाणे अधिक उत्तम असते. कोबी, ब्रोकोली, पालक, मुळा यांसारख्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे त्या रात्री खाऊ नयेत. हाय कॅलरीवाले पदार्थांचे पचन करण्यासाठी शरीराचे तापमान वाढते. आणि रात्री शांत झोप लागण्यासाठी सामान्य अथवा थंड तापमानाची गरज असते. म्हणून रात्रीच्या वेळेस या भाज्या खाणे टाळावे.

मसालेदार अन्न

अति तिखट अथवा मसालेदार पदार्थांमुळे मुलांना पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. अपचन,गॅस किंवा पोटदुखी यामुळे मुलांची रात्रीची झोप मोडू शकते. त्यामुळे मुलांना रात्रीच्या जेवणात तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यास देऊ नयेत.

गोड पदार्थ

अति गोड पदार्थ खाणे शरीरासाठी अपायकारक असते. डेझर्ट, सोडा , चॉकलेट, मिठाई यासारखे पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शरीराचे कामही वाढते. ज्यामुळे ॲड्रेनल कॉर्टिसॉल रिलीज होते. त्याच्यामुळे झोपेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो. गोड पदार्थ खाऊन झोपल्यास रात्री मुलांची झोपमोड होऊ शकते.

जड जेवण आणि चटकमटक पदार्थ

वाढत्या वयातील मुलांसाठी फुल फॅट जेवण चांगले असते, पण ते रात्रीच्या वेळेस खाणे योग्य नाही. रात्री झोपण्यापूर्वी असे अन्न खाल्यास जाडेपणा वाढण्याचा धोका असतो. जेवण झाल्यावर लगेच झोपल्यामुळे जळजळणे, ॲसिडिटी त्रास होऊ शकतात, ज्यामुळे शांत झोप लागणे कठीण असते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.