सगळेच लोक संजय राऊत यांना त्यांची लायकी दाखवून देतायेत; संजय शिरसाट यांचा घणाघात

| Updated on: May 09, 2023 | 6:25 PM

Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर टीका, अजित पवार-नाना पटोले यांचा दाखला; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

सगळेच लोक संजय राऊत यांना त्यांची लायकी दाखवून देतायेत; संजय शिरसाट यांचा घणाघात
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना प्रत्येक पक्षाच्या लोकांनी त्यांची लायकी दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नाना पटोले म्हणाले, चोंबडेगिरी करू नकोस. अजितदादा पवारांनी सांगितलं की, आमच्या प्रवक्ता बनू नको. आमच्या घरातले प्रश्न आम्ही सोडवू.आम्ही बघून घेऊ त्यामध्ये तुम्ही पडू नका. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? काहीहीनसंकल्पना सुचवणारे मूर्ख असे संजय राऊत आहेत. त्यामुळे आता एकटे पडले आहेत, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय राऊता यांना आपला पक्ष वाचवता आला नाही. ज्याने फक्त पक्ष संपवण्याची सुपारी घेतली. त्यांच्याबद्दल काय बोलावं?, असं टीकास्त्र शिरसाट यांनी डागलं आहे.

‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलंय. सिनेमातून महिलांना अपमानित केलं जातंय. केरळ राज्याचा अपमान केला जातोय, असं आव्हाड म्हणाले. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे आहे. त्यामुळे अशा प्रकारे ते वक्तव्य करत आहेत. आपल्या आया बहिणींच्या बरोबर रस्त्यावरती पडलेल्या असताना त्यांना अशा प्रकारची विधानं कशी काय सुचतात, असा प्रश्न मला आव्हाडांना विचारायचा आहे, असंही शिरसाट म्हणाले.

सत्तासंघर्षाचा निकाल आमच्याच बाजूने

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याचं बोललं जात आहे. निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावा संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत आणि संजय राऊत हे बिनडोक आहेत. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. ते अचानक असेच निवडून आलेले आहेत. ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची यांना अक्कल नाही. संजय राऊत सुप्रीम कोर्टाच्या जज आहेत का? आम्ही सत्यासाठी आणि न्यायाच्या बाजूने लढलेलो आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच येईल. सर्वोच्च न्यायलय जेव्हा आमच्या बाजूने निर्णय देईल. तेव्हा जतेलाही तो निर्णय पटेल, असंही शिरसाट म्हणालेय.