British Railway Royalty : भारतातील या रेल्वे ट्रॅकवर गोऱ्या साहेबांची सत्ता हाय रं!

British Railway Royalty : आजही भारतात अजब-गजब घटना समोर येतातच. देशातून ब्रिटिश जाऊन जमाना लोटला. पण ब्रिटिशांच्या मालकीचा एक रेल्वे ट्रॅक चक्क देशात आहे आणि त्यासाठी त्यांना रॉयल्टीही द्यावी लागते. गोऱ्या साहेबांची ही अखेरची निशाणी आहे तरी कुठे?

British Railway Royalty : भारतातील या रेल्वे ट्रॅकवर गोऱ्या साहेबांची सत्ता हाय रं!
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 8:18 PM

नवी दिल्ली : आजही भारतात अजब-गजब घटना समोर येतातच. देशातून ब्रिटिश जाऊन जमाना लोटला. पण ब्रिटिशांच्या मालकीचा एक रेल्वे ट्रॅक (British Company) चक्क देशात आहे आणि त्यासाठी त्यांना रॉयल्टीही (Royalty) द्यावी लागते. स्वतंत्र भारतात आता कुठं अशी गोष्ट घडणार का? केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वोच्च न्यायालय असताना असा काही प्रकार असेल यावर तुमचा चारआणेही विश्वास बसणार नाही. पण हा रेल्वे ट्रॅक (Railway Track) अजूनही ब्रिटिशांच्या मालकीचा आहे. तुम्हाला धक्का बसेल, पण हेच सत्य आहे. आता यामागाचं कारण काय हे तेवढं विचारु नका. कारण त्यासाठी इतिहासाची अख्खी सणावळ, पानं उलटावी लागतील. इंग्रज तर देश सोडून निघून गेले. पण या रेल्वे ट्रॅकच्या स्वामित्वापोटी त्यांना मानधन द्यावे लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोऱ्या साहेबांची ही अखेरची निशाणी आहे तरी कुठे?

देशात दळणवळण सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली नव्हती. तर त्यांना राज्य करणे सुलभ आणि सोपे व्हावे यासाठी हा खटाटोप त्यांनी केला होता. पण त्यामुळे देशात आधुनिक विकासाची चक्रे फिरली. रेल्वेच्या सुविधेमुळे दळणवळण सोपे झाले. देशाच्या कानाकोपऱ्यात जलदगतीने पोहचता यायला लागले. मालवाहतूक सोपी झाली. भारताची लूट करताना ब्रिटिशांना रेल्वेचा मोठा फायदा झाला, हे सत्य नाकारुन चालत नाही.

ब्रिटिश सरकारने देशात रेल्वेचे जाळे अंथरताना आणि रेल्वे स्टेशन तयार करताना हा रेल्वे रुट एखाद्या समुद्री बंदरापर्यंत जाईल याची तजवीज करुन ठेवली होती. त्यामुळे त्यांना भारतातील किंमती, मौल्यवान वस्तू आणि इतर कच्चा माल जलदगतीने इंग्लंडला पोहचविता येत होता.

हे सुद्धा वाचा

देशातील या एका रेल्वे ट्रॅकची अशीच ही अजब गोष्ट आहे. या रेल्वे मार्गाचा वापर करण्यासाठी भारतीयांना ब्रिटिश कंपनीला मानधन द्यावे लागते. या मानधनातून कंपनीला नियमित उत्पन्नाचा स्त्रोत मिळतो. इंग्रज सोडून गेले तरी त्यांची मालकी अजूनही या रेल्वे ट्रॅकवर आहे. या रेल्वे ट्रॅकला शकुंतला रेल्वे ट्रॅक अशी ओळख आहे. हा रेल्वे ट्रॅक एखाद्या आदिवासी, डोंगराळ भागात नाही, तर आपल्या महाराष्ट्रात आहे.

यवतमाळ ते अचलपूर या दरम्यान हा रेल्वे ट्रॅक आहे. या रेल्वे मार्गाची लांबी जवळपास 190 किलोमीटर आहे. या रेल्वे ट्रॅकवर आजही पॅसेंजर ट्रेन धावते. स्थानिक लोकांसाठी हा स्वस्त आणि लवकर इच्छितस्थळी पोहचण्याचा मार्ग आहे. भारत सरकारने हा रेल्वे ट्रॅक खरेदीचा यापूर्वीही प्रयत्न केला. पण त्यात अडचण आली. आतापर्यंत या रेल्वे मार्गाची मालकी ब्रिटिश कंपनीकडेच आहे.

1952 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. परंतु, हा एकमेव रेल्वे मार्ग यातून सूटला. या 190 किमी ट्रॅकची मालकी आजही ब्रिटिश कंपनीकडे आहे. हा प्रवास 7 तासांचा आहे. क्लिक निक्सन ॲंड कंपनीकडे या रेल्वे ट्रॅकची मालकी आहे. त्यांची कंपनी, सेंट्रल प्रोव्हिजंस रेल्वे कंपनीला दरवर्षी मोठे मानधन आताही द्यावे लागते.

हे रेल्वे गेल्या 70 वर्षांपासून वाफेच्या इंजिनावर धावत होती. परंतु, 1994 मध्ये वाफेचे इंजिनाऐवजी डिझेल इंजिनाचा वापर सुरु झाला. तसेच यापूर्वीच्या डब्ब्यांना अजून 6-7 डब्बे जोडण्यात आले. अचलपूर-यवतमाळ या रेल्वे मार्गावर एकूण 16-17 छोटे-मोठे स्टेशन येतात. 190 किलोमीटरचे अंतर ही रेल्वे जवळपास 7 तासात पूर्ण करते. हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.