तिरंग्याच्या सन्मानार्थ झेंडा गीत लिहिणारे कोण?, पंडित नेहरूही झाले होते आनंदी
काँग्रेसच्या अधिवेशनात तिरंगा आपला राष्ट्रीय झेंडा राहील. त्यामुळे झेंडा गीत तयार करावा लागेल, असं गणेश शंकर म्हणाले होते.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एक फोटो ट्वीट केला. त्यात ते तिरंगा फडकवत आहेत. त्यात त्यांनी विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उँचा रहे हमारा, असं लिहीलं. परंतु, हे गीत कोणी लिहिलं तुम्हाला माहीत आहे का. हे गीत लिहिणारे आहेत श्यामलाल गुप्त. श्यामलाल हे लखनौजवळील कानपूरचे रहिवासी. झेंडा उँचा रहे हमारा हे गीत महात्मा गांधी आणि पंडित नेहरू या दोघांनाही पसंत आले होते. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात गायलं जात होतं. झेंडा उँचा रहे हमारा हे गीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर श्यामलाल गुप्त यांनी १४ एप्रिल १९२४ रोजी गायीलं होतं. स्वातंत्र्यानंतर हे गीत झेंडा गीत मानलं जाईल, असं पंडित नेहरू म्हणाले होते. जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर हे गीत श्यामलाल गुप्त यांनी गायीलं होतं. १९९१ साली फरिश्ते चित्रपटात हे गाणं म्हटलं गेलं. आनंद बक्शी यांनी हे गाणं कम्पोज केलं होतं. श्यामलाल गुप्त यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. १९४४ मध्ये त्यांना जेलही झाली होती.
महात्मा गांधी यांनी सूचवल्या होत्या सुधारणा
काँग्रेसच्या अधिवेशनात तिरंगा आपला राष्ट्रीय झेंडा राहील. त्यामुळे झेंडा गीत तयार करावा लागेल, असं गणेश शंकर म्हणाले होते. त्यांनी श्यामलाल गुप्त यांच्याकडून हे गीत लिहून घेतलं. मूळ गीतातील बजरंग बलीच्या ठिकाणी भारत जननी असा शब्द वापरण्यात आला. महात्मा गांधी यांनी या गीतात काही सुधारणा सुचवल्या.
वडाच्या झाडाखाली बसून लिहिले गीत
श्यामलाल गुप्त यांच्या झेंडा उँचा रहे हमारा या गीताला १९३८ मधील हरीपुरा काँग्रेसने मान्यता दिली होती. हरीपुरा काँग्रेसमध्ये पाच हजार लोकांनी हे गीत एकावेळी म्हटलं होतं. श्यामलाल गुप्त यांनी वडाच्या झाडाखाली बसून हे गीत ४ मार्च १९२४ रोजी लिहीलं होतं. त्याठिकाणी गुप्त यांचे फोटो लावण्यात आले आहेत. कानपूरच्या नरवल गावात ९ सप्टेंबर १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला.
रामकथा सांगता सांगता स्वातंत्र्यलढ्यात उडी
माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी त्यांना व्यापारी करण्याचा प्रयत्न केला. पण, श्यामलाल गुप्त हे रामकथा सांगतं. घरी व्यापारासाठी दबाव टाकल्यानंतर ते अयोध्येला गेले होते. कुटुंबीयांनी त्यांना परत कानपूरला आणले. येथे त्यांचा संपर्क गणेश शंकर यांच्याशी झाला. रामकथा सांगत सांगत ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले. श्यामलाल गुप्त यांचे हे गीत ऐकूण इंदिरा गांधी यांनाही रडू कोसळले होते.