मानवी ह्रदयात सापडले प्लास्टिकचे कण, जाणून घ्या असं कसं झालं?
हॉस्पिटलमध्ये ह्रदयावर शस्त्रक्रीया करणाऱ्या १५ रुग्णांच्या रक्त आणि ह्रदयामध्ये टिश्यू सॅम्पल सापडले. या तपासणीत मायक्रोप्लास्टिक असल्याचं स्पष्ट झालं.
नवी दिल्ली : प्लास्टिक आता मानवाच्या रक्तापर्यंत मर्यादित राहिली नाही. प्लास्टिक आता मानवाच्या ह्रदयापर्यंत पोहचली. ही घटना चीनमधील आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, १५ रुग्णांमध्ये ९ प्रकारचे प्लास्टिक पार्टिकल सापडले. चीनच्या बिजींग एंझेन हॉस्पिटलमध्ये ह्रदयावर शस्त्रक्रीया करणाऱ्या १५ रुग्णांच्या रक्त आणि ह्रदयामध्ये टिश्यू सॅम्पल सापडले. या तपासणीत मायक्रोप्लास्टिक असल्याचं स्पष्ट झालं. मानवी शरीरात मायक्रोप्लास्टिक आढळल्याने खळबळ उडाली. जगातील ही पहिली घटना आहे. जाणून घ्या रुग्णांच्या ह्रदयापर्यंत मायक्रोप्लास्टिक कशी पोहचली. डॉक्टरांच्या चमूने याचा पत्ता कसा लावला.
असा दिसला मायक्रोप्लास्टिक
तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णालयात १५ जणांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरी करण्यापूर्वी त्यांचे रक्त आणि ह्रदयाचे टिश्यू सॅम्पल घेण्यात आले. त्यावेळी असं माहीत झालं की, मायक्रोप्लास्टिकच्या कणांचा आकार ५ मिलीमीटरपेक्षा कमी होता. हे असे कण होते जे प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करणाऱ्या पॅकिंगमध्ये असतात. जेवणादरम्यान पाणी पिताना हे कण शरीरात गेले असावेत.
ह्रदयापर्यंत कसे पोहचले मायक्रोप्लास्टिक
डॉक्टर म्हणाले, तपासणीदरम्यान रक्त आणि ह्रदयात टिश्यू सापडलेत. हे मायक्रोप्लास्टिक श्वास किंवा भोजनाच्या माध्यमातून शरीरात पोहचले. प्लास्टिकचे कण किती धोकादायक आहेत यावर कँसरसारखे आजार होऊ शकतात. भविष्यात नपुंसकत्व आणू शकतात. प्लास्टिकचे कण शरीरात पोहचल्यानंतर शरीरात पोहचतात आणि डॅमेज करू शकतात. संशोधनात असं समोर आलं की, मानव क्रेडीट कार्डचा वापर करून मायक्रोप्लास्टिक खातात.
९ प्रकारचे प्लास्टिक कण
रुग्णांच्या शरीरात नऊ प्रकारचे प्लास्टिक कण सापडलेत. प्लास्टिकला पॉलीप्लास्टिकमध्ये ठेवले जाते. याला टेराफथेलेट म्हणून ओळखले जाते. फूड कंटेनर तयार करण्यासाठी पॉलीस्पास्टिकचा वापर केला जातो. खिडक्या, ड्रेनेज पाईप यांचा वापर करताना प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यातूनही प्लास्टिकचे कण जातात.