विज्ञानाची कमाल, एकाच गर्भातून दोन सख्या बहिणी होणार आई, समजून घ्या कसा झाला हा चमत्कार

एका टीमने डोनरचे गर्भाशय काढले. या प्रक्रियेला आठ तास लागले. रुग्णात काय बदल होतात, याचा अभ्यास करण्यात आला.

विज्ञानाची कमाल, एकाच गर्भातून दोन सख्या बहिणी होणार आई, समजून घ्या कसा झाला हा चमत्कार
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 10:02 PM

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये ४० वर्षांच्या महिलेच्या पोटातून तिच्या ३४ वर्षीय बहिणीच्या पोटात गर्भ ट्रान्सप्लांट (Transplant) करण्यात आला. ही ब्रिटनमधील पहिली घटना आहे. हे ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे. दोन्ही महिला या इंग्लंडच्या राहणाऱ्या आहेत. जिच्या गर्भात गर्भ (Uterus) होता ती दुर्धर आजाराने त्रस्त आहे. तिथं गर्भाशय पूर्णपणे विकसित होण्यासंदर्भात भीती होती. या ट्रान्सप्लांटसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा खर्च आला. एका महिलेचे गर्भाशय काढून दुसऱ्या महिलेच्या पोटात कसे टाकले जाणून घ्या.

30 तज्ज्ञांची टीम, १७ तास सर्जरी

या ट्रान्सप्लांटसाठी १७ तास लागले. ३० तज्ज्ञांची टीमने यासाठी काम केले. सर्जरी करणारे डॉक्टर म्हणाले, संबंधित महिला दुर्धर आजाराने त्रस्त होती. गर्भाशय नसल्याने गर्भ पूर्णपणे विकसित झाला नसता. परंतु, ओवरी काम करत होती. महिला आणि तिचे पती हे फर्टीलीटी ट्रीटमेंट करत होते. ८ भृण स्टोअर करण्यात आले. ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी दोन्ही महिलांची काऊंसलिंग करण्यात आली. ह्यूमन टिश्यू अथॉरिटीची मंजुरी मिळाल्यानंतर ट्रान्सप्लांट करण्यात आले. सर्जरीचा खर्च वोंब ट्रान्सप्लांट युके नावाच्या ट्रस्टने केला.

असे झाले गर्भ ट्रान्सप्लांट

द जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, सर्जरी ऑक्सफोर्डच्या चर्चिल हॉस्पिटलमध्ये झाली. सर्जरी करणाऱ्या टीममध्ये चॅरिटी वोंब ट्रान्सप्लांट युकेचे हेड प्रोफेसर रीचर्ड स्मीथ, इम्पेरीयल कॉलेज हेल्थकेअरच्या सल्लागार गायनॉकॉलॉजीकल सर्जन आणि ऑक्सफोर्ड ट्रान्सप्लांट सेंटरच्या सल्लागार सर्जन ईसाबेल क्विरोगा सहभागी होते.

एका टीमने डोनरचे गर्भाशय काढले. या प्रक्रियेला आठ तास लागले. रुग्णात काय बदल होतात, याचा अभ्यास करण्यात आला. रीचर्ड स्मीथ म्हणतात, ट्रान्सप्लांट करणाऱ्या महिलेला इम्युनोसप्रेसीव्ह थेरपी दिली जात आहे. आता तिचे बाळ तिच्याच गर्भात विकसित होईल. डोनर महिला आधीच दोन मुलांची आई आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ अशी घटना आहे. यामुळे विज्ञानाचा चमत्कार असं या घटनेकडं पाहीलं जातं. एकच गर्भ पण, दोन सख्या बहिणी आई होणार आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.