Indian Currency Note : तुम्हाला काय वाटलं कागदापासून तयार होते भारतीय नोट?

Indian Currency Note : भारतीय नोटा कागदापासून तयार होतात हा मोठा भ्रम आपल्याला आहे. काही तज्ज्ञांनाच माहिती आहे की भारतीय नोटा या कागदापासून नव्हे तर या वस्तूपासून तयार होतात. काय आहे ही वस्तू?

Indian Currency Note : तुम्हाला काय वाटलं कागदापासून तयार होते भारतीय नोट?
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली : भारत वेगाने डिजिटलायझेशनकडे वळत आहे. या मार्गावर भारताने क्रांतीकारी झेप घेतली आहे. युपीआय व्यवहारांच्या (UPI Transaction) माध्यमातून भारताने जगात आघाडी घेतली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी आजही रोखीतूनच व्यवहार करण्यात येतो. आजही अनेक लोकांना असा समज आहे की, भारतीय नोटा (Currency Note)या कागदापासून तयार करण्यात येतात. परंतु, हा मोठा भ्रम आहे. भारतीय नोटा कागदापासून तयार करण्यात येत नाही. सध्या 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहे. या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा उपयोग होत नाही. जर नोटा कागदापासून तयार करण्यात आल्या असत्या तर त्या पाण्याने लवकर खराब झाल्या असत्या. नोटांचे आयुष्य जास्त रहावे यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कागदापासून नोटा तयार करत नाही.

आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयीची माहिती उपलब्ध आहे. त्यामध्ये नोटा तयार करण्याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार नोटा तयार करण्यासाठी कागदाचा नाही तर कपासाचा उपयोग करण्यात येतो. कागदापेक्षा कापसाचे आयुष्य अधिक असते. त्यामुळे या नोटा दीर्घकाळ टिकतात. नोटा तयार करण्यासाठी कापसाचा 100 टक्के वापर करतात. कापसापासून तयार नोट कागदापेक्षा अधिक मजबूत असतात.

इतर देशात कोणत्या वस्तूचा वापर होतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. युरोपियन देशात आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तरीही अनेक देशात आजही कापसाचाच वापर नोटा तयार करण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे कागदापेक्षा कापसाचा वापर नोटा तयार करण्यासाठी होतो, हे लक्षात ठेवा. कागदापासून नोट तयार होते, हा भ्रम आज डोक्यातून काढून टाका.

हे सुद्धा वाचा

कापसात लेनिन नावाचे फायबर असते. त्याचा वापर नोटा तयार करण्यासाठी करण्यात येतो. कापसाच्या धाग्यांमध्ये लेनिन असते. त्यामध्ये गॅटलिन आणि Adhesive Solution एकत्रित करण्यात येते. त्यामुळे नोटा लवकर खराब होत नाही. या नोटा दीर्घकाळ टिकतात. नोटा तयार करताना त्याच्या सिक्युरिटी फिचर्सवर खास लक्ष देण्यात येते. त्यामुळे किती बनावट नोटा बाजारात आल्यातरी त्या चटकन आणि पटकन पकडल्या जातात. या नोटा तयार करणारे गजाआड होतात. सिक्युरिटी फिचर्समुळेच खरी आणि बनावट नोट यातील तफावत समोर येते.

RBI ने कोणतीही नोट ओळखण्यासाठी एकूण 17 ओळख पटविणारी चिन्हे सांगितली आहेत. त्यानुसार, या चिन्हांमुळे खऱ्या आणि खोट्या नोटेत फरक ओळखता येतो. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटेसंबंधी कोणती चिन्ह महत्वाची आहेत ते लक्षात घेऊयात.

दिव्यासमोर नोट धरल्यास त्यावर 500 लिहिलेले आढळेल. महात्मा गांधीचे छायाचित्र मध्यवर्ती असते. भारत आणि इंडिया अशी नावे कोरलेली असतात. नोट मोडल्यावर त्यावर सुरक्षेचा थ्रेड रंगात दिसून येतो. हिरव्या रंगातून निळ्या रंगात बदलविता येतो.

गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लॉज, प्रोमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो नोटेच्या दोन्ही बाजूने चिन्हाकिंत असतो. महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क दिसून येतो. डाव्या बाजूचे आणि खाली उजव्या बाजूचे क्रमांक डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.