ज्या मुलाने सत्ता मिळवून दिली त्याचं मुलाला औरंगजेबाने का मारले?
सामुगढच्या लढाईत औरंगजेबाने दाराला हरवले. सत्तेच्या षडयंत्रात त्याच्यासोबत भाऊ मुराद बख्श होते. ते दोघेही आगऱ्याच्या दिशेने जात होते.
नवी दिल्ली : परदेशी चिकित्सक फ्रांस्वा बर्नियर आपल्या लेखात म्हणतात, सुलतानने बादशाहाची गोष्ट समजून घेतली असती, तर आपल्या वडिलांच्या जागी तो मुघल बादशाह राहिला असता. मुघल सत्ता प्राप्त करण्यासाठी औरंगजेबाने भावांची हत्या केली. वडील शाहजहाँला कैदेत ठेवले. परंतु, स्वतःला मुलगा सुलतानलाही त्याने सोडले नाही. आपला मुलगा आपल्याला धोकादायक ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर औरंगजेबाने त्यालाही सोडले नाही. औरंगजेब दारा शिकोहला हटवून स्वतः सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होता. ही गोष्ट परदेशी चिकित्सक फ्रांस्वा बर्नीयर यांनी आपल्या लेखात सांगितली आहे. बर्नीयर १६५८ साली हिंदुस्तानात पोहचले. दारा शिकोह यांचे ते जवळचे मित्र होते. मुघल साम्राज्याची काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्यात.
शाहजहाँ आणि औरंगजेब झाले होते शत्रृ
बर्नीयरने लिहिले की, ते वर्ष होते १६५८. सामुगढच्या लढाईत औरंगजेबाने दाराला हरवले. सत्तेच्या षडयंत्रात त्याच्यासोबत भाऊ मुराद बख्श होते. ते दोघेही आगऱ्याच्या दिशेने जात होते. महालात पोहचताच त्यांनी शाहजहाँला आमंत्रण दिले. बादशाह शहाजहाँचा आदेश ऐकण्यासाठी मी आगरा येथे आलो असल्याचं औरंगजेबाने म्हटले होते.
वडील आणि मुलाचा एकदुसऱ्यावरील विश्वास तुटला होता. शाहजहाँला माहीत होते की, औरंगजेबाच्या बोलण्या-वागण्यात खूप फरक आहे. औरंगजेबाने शाहजहाँला भेटायला यावं, असा संदेश पाठवण्यात आला. परंतु, औरंगजेबाची हिम्मत होत नव्हती.
औरंगजेबाला संशय होता की, बहीण जहाँआराने संदेश पाठवला असावा. कारण तिला वाटत होते की, दारा बादशाह बनावा. महालात गेल्यास आपला मृत्यू होऊ शकतो, अशी भीती औरंगजेबाला होती. शाहजहाँने महालाच्या आता जाण्याची हिम्मत दाखवली नाही.
औरंगजेबाचा संशय खरा ठरला
शाहजहाँने सैन्याच्या माध्यमातून औरंगजेबाला ताब्यात घेतले. औरंगजेबाला महालात नेण्यात आले. शाहजहाँने सुलतानला संदेश पाठवला की, त्याला बादशाह बनवण्यात येणार आहे. परंतु, सध्या त्याला साथ द्यावी लागेल. बर्नीयर लिहितात, सुलतानने बादशाहाची ऐकली असती तर आपल्या वडिलांच्या ठिकाणी तो बादशाह राहिला असता. औरंगजेबाची हिम्मत तुटली असती.
धोका होता म्हणून रचले षडयंत्र
औरंगजेबाला स्वतःच्या जवळच्या लोकांपासून धोका होता. मीर जुमलाने औरंगजेबाला गोलकुंडा किल्ल्यावर हल्ला करून खजिना लुटण्यास मदत केली होती. औरंगजेबाने सुलतान आणि मीर जुमला यांना आगरा येथे पाठवण्याची योजना तयार केली. दाराला कमजोर बनवण्यासाठी दुसरा भाऊ शाह शुजा यांना अटक करण्यासाठी योजना तयार केली. सेनेची जबाबदारी मीर जुमलाकडे दिली. मीर जुमलाला बंगाल ताब्यात घेऊन गव्हर्नर होण्यास सांगितले.
सुलतानला संपवले
औरंगजेबाच्या आदेशानंतर सुलतानला अटक करून ग्वालीयरच्या किल्ल्यात नेण्यात आले. काही वेळानंतर दिल्लीतील यमुना किनाऱ्यावरील सलीमगड किल्ल्यात ठेवण्यात आले. एक वर्ष कैदेत ठेवल्यानंतर १६७६ मध्ये विष पाजून मारण्यात आले.