Luna-25 : बलाढ्य रशियाच्या चांद्र मोहिमेला सर्वात मोठा धक्का… चांद्र मोहीम फेल; अंतराळात काय घडलं नेमकं?
बलाढ्य रशियाच्या मून मिशनला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25 हे यान लँडिंग आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं.
मॉस्को | 20 ऑगस्ट 2023 : बलाढ्य रशियाच्या मिशन मूनला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25 हे यान लँडिंग आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं. भारताच्या चांद्र यांनाच्या दोन दिवस आधीच म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर पाऊल ठेवणार होतं. पण त्याआधीच रशियाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
रशियाच्या स्पेस स्टेशननेही लून -25चा संपर्क होत नसल्याचं म्हटलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाला धडक दिल्यानंतर लूना-25 यान भरकटलं असून या यानाचा संपर्क तुटला असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार आधी आपल्या निर्धारीत मार्गावरून हे यान भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला धडकल्याचं सांगितलं जात आहे. लँडिंग पूर्वीच हे यान क्रॅश झाल्याने त्याचा संपर्क झाला आहे. विशेष म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे यानाची चंद्रावर सॉफ्ट लँडिग होणार होती.
मध्यरात्रीच बिघाड
काल मध्यरात्रीच या यानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संशोधकांनी या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. यान आधी भरकटलं आणि चंद्राच्या पृष्ठभागाला जाऊन धडकलं. त्यामुळे लूना-25 हे यान क्रॅश झालं. त्यामुळे रशियाचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंगलं आहे.
गोठलेल्या पाण्याच्या शोधासाठी
या मानवरहीत यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचं होतं. मात्र, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच यान क्रॅश झालं. चंद्राच्या एका भागाची माहिती घेण्यासाठी हे यान उद्या सोमवारी चंद्रावर उतरणार होतं. या यानाद्वारे चंद्रावरील गोठलेलं पाणी आणि चंद्रावरील किंमती तत्त्वांचा शोध घेतला जाणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं होतं.
Связь с автоматической станцией “Луна-25” прервалась, сообщает Роскосмос. По предварительным расчетам, станция перешла на нерасчетную орбиту и столкнулась с поверхностью Луны:https://t.co/G5zgXOwwQQ
Фото: Роскосмос pic.twitter.com/0sw1amvZcy
— ТАСС (@tass_agency) August 20, 2023
पुतीन यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प
चंद्राच्या परिघात या यांनाला एका आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागला. त्याचं विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने स्पष्ट केलं आहे. लूना-25 हे यांना 11 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. चांद्र मोहीम ही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. रशियाला अंतराळातील महाशक्ती बनविण्याचा त्यामागचा प्रयत्न होता.