Chandrayaan-3 : भारताचा चंद्रावर तिरंगा ! पाकिस्तान सरकारची तीन दिवसानंतर आली प्रतिक्रीया, काय म्हटले पाहा ?
एकीकडे पाकिस्तानीची जनता त्यांच्या सरकार आणि लष्कराच्या नावाने खडे फोडीत असताना तीन दिवसांनी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने आपले मौन सोडले आहे.
नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीमे अंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल सॉफ्ट लॅंडींग झाल्याने जगात भारतीय संशोधकांची पाठ थोपटली जात आहे. चंद्राच्या या खडतर भागात कोणत्याही देशाने आतापर्यंत यान उतरविण्याचे धाडस दाखविले नाही. भारताच्या कामगिरीनंतर अमेरिकेपासून ते युरोपीयन देश ते थेट रशियापर्यंत सगळ्यांनी कौतूक केले आहे. संयुक्त अरब अमिराती या मुस्लीम देशानेही याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. परंतू इतके काही घडत असताना आपला सख्खा शेजारी असलेला पाकिस्तान मात्र गप्प बसला होता.
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल सॉफ्ट लॅंडींग करीत इतिहास रचल्यानंतर पाकिस्तान सरकारचे कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नव्हते. परंतू आता तीन दिवसानंतर पाकिस्तानची पत्रकार मरियाना बाबर हीने दिलेल्या वृत्तानूसार पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तान म्हटले आहे की ‘ भारताचे चंद्रावर यान उतरविणे हा एक मोठा विजय आहे. भारताच्या शास्रज्ञ आणि संशोधकांचे या यशाबद्दल अभिनंदन ! ‘ यापूर्वी इमरान खान याच्या सरकारमध्ये माहीती खात्याचे मंत्री राहीलेले फवाद चौधरी यांनी देखील भारताच्या चंद्रयान-3 मोहीमेच्या यशाबद्दल मोकळेपणाने अभिनंदन केले होते. त्यांनी हा इस्रोसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानच्या पत्रकाराचे ट्वीट येथे पाहा –
PAKISTAN CONGRATULATES INDIA@ForeignOfficePk “India getting to the Moon is a big achievement. We congratulate Indian scientists on achieving this milestone.”
— Mariana Baabar (@MarianaBaabar) August 25, 2023
फवाद चौधरी यांनी ट्वीट केले
फवाद चौधरी यांनी ट्वीट करीत म्हटले होते की इस्रोसाठी हा किती शानदार क्षण आहे, चंद्रयान-3 चंद्रावर उतरले आहे, मी पहात आहे की तरुण संशोधक इस्रो अध्यक्षांसोबत नाचत आनंद साजरा करीत आहेत. तरूण पिढी मोठी स्वप्नं पहात असते, त्यांच्यात जगाला बदलण्याची जिद्द असते. चंद्रयान-3 च्या यशानंतर पाकिस्तानी जनता देखील भारताचे अभिनंदन करीत आहे. ती स्वत:च्या सरकारला आणि लष्करावर टीकाही करीत आहे, सोशल मिडीयात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात पाकिस्तानी स्वत:च्या देशाची टर उडवित आहेत.
भारताआधी पाकची अंतराळ संस्था स्थापन
पाकिस्तानचा वादग्रस्त टीकटॉकर हारिम शाह याने भारतावर घाणेरडी टीका केली होती. त्यानंतर लोकांनी त्याचा समाचार घेतला. विशेष भारताच्या आधी पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना झाली होती. परंतू आज त्यांची संस्था कुठेच नाही. भारतीय इस्रोचे नेतृत्व शास्रज्ञ करीत आहेत. तर पाकिस्तानच्या अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व लष्कराच्या हाती आहे. आता तर पाकिस्तानकडे अंतराळ संशोधनावर खर्च करायला पैसाही नसल्याने वैज्ञानिक संशोधन कसे करणार ?