जर विद्यार्थी शाळेत गैरहजर राहीला तर पालकांना जेल, येथे निघाला आदेश
एकही मुल शालाबाह्य राहू नये यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा आपल्याकडे आहे. तर या देशात विद्यार्थी गैरहजर राहीला तर थेट पालकांना तुरुंगवास घडणार आहे.
नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : विद्यार्थी देशाचे उद्याचे भवितव्य असतात. सर्व मुलांना शालेय शिक्षण मिळावे अशी प्रत्येक देशाची धोरणे बनवलेली असतात. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी असा प्रत्येक देशातील शैक्षणिक धोरणाचा उद्देश्य असतो. जर मुले शिकली नाहीत तर त्यांची आणि पर्यायाने देशाची प्रगती खुंटणार असते. शिक्षणामुळे एक चांगला नागरिक तयार होत असतो. आता एका देशाने तर मुले शाळेत आली नाहीत तर त्यांच्या पालकांनाच जबाबदार धरत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबियातील मेक्काह या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनूसार जर विद्यार्थी 20 दिवस शाळेत कोणतेही कारण न देता आला नाही तर त्या शाळेने अशा विद्यार्थ्याच्या पालकांची पब्लिक प्रोस्युक्युशन ऑफीसकडे तक्रार करावी असे आदेश सौदी अरेबियाच्या शालेय शिक्षण मंत्र्याने काढले आहेत. अशा मुलाच्या पालकांची किंग्डम चाईल्ड प्रोटेक्शन लॉ अंतर्गत पब्लिक प्रोस्युक्युशन ऑफीस चौकशी करणार आहे.
शाळेत येत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाची सरकारी पक्षाचे पब्लिक प्रोस्युक्युशन अधिकारी रितसर चौकशी करतील त्यांना त्यात काही पालकांचा हलगर्जीपणा किंवा दोष आढळला तर त्यांची केस क्रिमिनल कोर्टाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर संबंधित न्यायालयात अशा बेजबाबदार पालकांना मुलांच्या गैरहजेरीबाबत खुलासा करण्यासाठी न्यायाधीश आवश्यक मुदत देतील आणि निकाल देतील.
शाळेच्या प्रिन्सिपलवर जबाबदारी
अशा प्रकरणात शाळेच्या प्रिन्सिपलवर शिक्षण मंत्रालयाला गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांची माहीती पुरविण्याची जबाबदारी असेल. त्यानंतर चौकशी होऊन अशा पालकांबाबत कुटुंब कल्याण विभागाकडे चौकशी होऊन निर्णय घेतला जाईल. पालकांचा जर हलगर्जीपणा आढळला तर त्याबाबत न्यायाधीश त्यांना द्यावयाचा शिक्षेबाबत निकाल देतील.
चाईल्ड प्रोटेक्शन लॉ अंतर्गत खटला
तीन दिवस विद्यार्थी न कळविता गैरहजर राहीला तर प्राथमिक स्वरुपात सूचना देऊन विद्यार्थ्यांच्या वर्ग शिक्षकाकडे प्रकरण सोपविले जाईल. पाच दिवस विद्यार्थी गैरहजर राहीला तर दुसरी वॉर्गिंग दिली जाईल आणि पालकांना सूचना दिली जाईल. विद्यार्थी दहा दिवस गैरहजर राहील्यास पालकांना तिसरी वॉर्निंग दिली जाऊन समन्स बजावले जाईल. जर पंधरा दिवस पाल्य गैरहजर राहिल्यास एज्युकेशन डीपार्टमेंटद्वारे त्या विद्यार्थ्याची बदली दुसऱ्या शाळेत करेल आणि 20 दिवस विद्यार्थी शाळेत आला नाही तर चाईल्ड प्रोटेक्शन लॉ अंतर्गत पालकांवर खटला उभारला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.