महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकारणाची COPY थेट ब्रिटनमध्ये; मंत्र्यांसह 40 जणांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने ब्रिटनचे सरकार कोसळले

पंतप्रधानांविरोधात अविश्वास एवढा वाढला की थेट सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. सर्व मंत्र्यांनी धडाधड आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे दिले. 36 तासांपूर्वी ज्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, त्या मिशेल डोनेलन यांनीही राजीनामा दिला. बुधवारी संध्याकाळपर्यंत 17 कॅबिनेट, 12 सचिव आणि परदेशात नियुक्त केलेल्या 4 प्रतिनिधींनी राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार पडले आणि त्यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकारणाची COPY थेट ब्रिटनमध्ये; मंत्र्यांसह 40 जणांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने ब्रिटनचे सरकार कोसळले
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 5:26 PM

लंडन : महाराष्ट्राच्या राजकारणाची कॉपी थेट ब्रिटनमध्ये पहायला मिळाली आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत वेगळा गट निर्माण केला आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचे सरकार पाडले. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच बंड ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात झाले आहे. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

पंतप्रधानांविरोधात अविश्वास एवढा वाढला की थेट सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. सर्व मंत्र्यांनी धडाधड आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे दिले. 36 तासांपूर्वी ज्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, त्या मिशेल डोनेलन यांनीही राजीनामा दिला. बुधवारी संध्याकाळपर्यंत 17 कॅबिनेट, 12 सचिव आणि परदेशात नियुक्त केलेल्या 4 प्रतिनिधींनी राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार पडले आणि त्यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले.

बोरिस यांची कार्यपद्धती, लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेली पार्टी आणि काही नेत्यांचा सेक्स स्कँडलमधील सहभाग असे मुद्दे उपस्थित करत मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि मंत्रीपदाचे राजीनामे दिले.

पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांना कल्पना होती

बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसपूस सुरु होती. मंत्री मंडळातील मंत्र्यांसह पक्षातील अनेक नेते जॉन्सन यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी 5 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर सायमन हार्ट, ब्रँडन लुईस यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्र्यांच्या या गळतीमुळे विरोधकांनी थेट जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर त्यांना देखील पदाचा राजीनामा द्यावा लागला.

भारतीय वंशाचे उमेद्वार ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार

भारतीय वंशाचे उमेद्वार ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये भारतीय वंशाचे अर्थमंत्री राहिलेले ऋषी सुनक हे देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहेत. सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये इतिहास घडवला जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी त्यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने देखील भाकीत केले होते की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.