China Economic : कोरोनाने चीनचा वाजवला बॅन्ड, ५० वर्षांत सर्वात कमी विकासदर

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या शांघायसारख्या शहरांत दीर्घकालीन लॉकडाऊन केले गेले. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले. लोकसंख्येत घट चीनच्या विकासावर परिणाम करणारी आहे.

China Economic : कोरोनाने चीनचा वाजवला बॅन्ड, ५० वर्षांत सर्वात कमी विकासदर
चीनची अर्थव्यवस्था घसरली आहे. Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 8:15 AM

बिजिंग : मागील वर्षी कोरोनावर मात करण्यासाठी चीनने झीरो कोविड धोरण राबवले. मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले. त्यांच्या या धोरणाची किंमत विकासाला (China Economic)घरघर लावून चीनला मोजली लागत आहे. चीनच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये चीनचा विकासदर केवळ ३% राहिला. ५० वर्षांतील हा दुसरा नीचांक आहे. यापूर्वी १९७४ मध्ये २.३ टक्के विकास दर होता.२०२१ मध्ये चीनचा विकास दर ८.१ टक्के होता. चीन सरकारने २०२२ साठी ५.५% विकास दराचे उद्दिष्ट ठरवले, परंतु ते गाठण्यात अपयश आले. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या शांघायसारख्या शहरांत दीर्घकालीन लॉकडाऊन केले गेले. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले. चीनच्या जीडीपीचा आकार २०२१ मध्ये १८ हजार अब्ज डॉलर होता. आता १७ हजार ९४० अब्ज डॉलरवर घसरला आहे.

भारताला थेट लाभ शक्य : 

चीनमधील उत्पादन घटले आहे. म्हणजेच निर्यात कमी झाली. म्हणूनच जगासाठी चीनचा पर्याय ठरण्याची संधी भारताकडे आली आहे. आता भारतात नोकऱ्या वाढण्याची मोठी शक्यता आहे.भारतातील निर्यात वाढल्यामुळे व्यापारातील तोटा कमी होईल. यातून डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट होईल. परदेशी गुंतवणूकदार चीनऐवजी आता भारताला महत्त्व देऊ शकतात. आशियात भारताचे वर्चस्व वाढेल. भारत ट्रेड लीडर होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.

हे सुद्धा वाचा

लोकसंख्येत मोठी घट :  चीनचे लोकसंख्या धोरण आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरले आहे. चीनच्या लोकसंख्येत मोठी घट झाली आहे. २०२१ पासून चीन सरकारने एकपेक्षा अधिक मुल जन्माला घालण्यास प्रोत्सहान दिले आहे. चीनमध्ये १९७१ नंतर सर्वात कमी जन्मदर आहे. भारत चीनच्या तुलनेमध्ये दहा वर्षांनी तरुण आहे. चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय ३८.४ वर्षे आहे. भारतात ते सरासरी २८.७ वर्षे आहे.चीनमध्ये २०२२ मध्ये ९५ लाख ६ हजार मुले जन्माला आली तर १ कोटी ४ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजेच जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर जास्त झाला.

भारत टाकणार चीनला मागे :  चीनची लोकसंख्या १४१.२ कोटी आहे. भारताची अंदाजित लोकसंख्या १४०.८ कोटी आहे. यंदाच्या पहिल्या सहामाहीत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार आहे. चीनची कमी होणारी लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासातील अडथळा ठरू लागली आहे. भारताला युवा लोकसंख्या फायदेशीर ठरत आहे. चीनच्या तुलनेत भारताची उत्पादन क्षमता आता वाढणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.