फिट रहायचं असेल तर अवलंबवा हा सोपा उपाय, जाणून घ्या 80: 20 फॉर्म्युला..
आपण फिट, तंदुरुस्त रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : आपण फिट, तंदुरुस्त रहावं (fitness) अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण फिटनेससाठी योग्य आहाराची गरज असते. संतुलित आहार (balanced diet) हा चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र मानला जातो. वेळोवेळी विविध डाएट प्लान्स आणि फिटनेस टिप्स येत असतात, काही जण ते फॉलोही करतात, पण त्यापैकी फारच कमी लोकांना त्याचा दीर्घकाळ फायदा होतो.
पण ’80:20 आहार नियमाचा’ लोकांवर परिणाम होताना दिसतो. या नियमाचा अर्थ असा की आपल्या प्लेटमध्ये आपण 80% भाज्या, फळे, सॅलड्स, प्रथिने इत्यादी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केले पाहिजे आणि फक्त 20% हे कार्बोहायड्रेट आणि मिठाई यांचे सेवन करावे. आहार संतुलित ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी ही सोपी टिप खूप प्रभावी ठरताना दिसते.
आपण सर्वजण आपल्या जीवनात संतुलन किंवा बॅलन्स शोधत असतो. विशेषत: जेव्हा आरोग्याचा आणि जीवनाचा आनंद घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा 80:20 आहाराचे सूत्र हे बॅलन्स साधण्यास मदत करते. याद्वारे आपण खाण्यापिण्याचा आनंदही घेऊ शकतो आणि आपल्या आहाराचा बॅलन्सही राखू शकतो. जेव्हा आपण 80% वेळा आरोग्यदायी गोष्टी किंवा पदार्थ खातो, तेव्हा आपण अधिक पोषक, फायबर आणि इतर आवश्यक गोष्टींचे सेवन करतो, ज्या आपले शरीर तंदुरुस्त अथवा फिट ठेवतात.
तर आपण जेव्हा 20% वेळा आपल्या आवडीचे पदार्थ खाता, त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि आपण बऱ्याच काळापर्यंत आरोग्यदायी आहाराचे सेवन करू शकता. जर आपल्याला आपल जीवन संतुलित आणि निरोगी हवे असेल तर ’80:20 आहार सूत्र’ अवलंबू शकतो.
80 : 20 आहार नियमाचे फायदे जाणून घ्या
– यामुळे आहार संतुलित होतो आणि सर्व पोषक तत्वांचा समावेश होतो.
– त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
– यामुळे ओव्हरइटिंगपासून बचाव होतो.
– यामुळे पाचन तंत्र चांगले राहते.
– 80:20 नियमाने उर्जेचा स्तर कायम राहतो.
– हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
– यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते
– फिटनेस आणि आरोग्य उत्तम राहते
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)