Lose weight | साठलेली चरबी कशी कमी होईल? वजन कमी करा सकाळ-संध्याकाळ फक्त चावा ‘ही’ पाने

आजकाल बरेच लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत आणि त्यांना लवकर वजन कमी करायचे आहे. अनेक प्रयोग केल्यानंतर, आपल्याला कळून चुकते की, वजन कमी करणे सोपे काम नाही. येथे तुम्हाला काही आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, त्याची पाने चावल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Lose weight | साठलेली चरबी कशी कमी होईल? वजन कमी करा सकाळ-संध्याकाळ फक्त चावा ‘ही’ पाने
साठलेली चरबी कशी कमी होईल?Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 5:21 PM

वजन कमी करण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळणे आणि सर्व प्रकारचे महागडे डाएट प्लॅन (Expensive diet plan) फॉलो करणे हे सर्वांनांच अंगलट येत आहे. वजन कमी करण्यासाठी, आजकाल प्रत्येकाला सोपा मार्ग हवा आहे. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर वजन कमी करण्याचे काही नैसर्गिक मार्ग (The natural way) आहेत, जे तुम्हाला मदत करू शकतात. खरं तर, काही औषधी वनस्पती देखील आहेत ज्यांचा दररोज वापर केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. अजमोदापासून ते पेपरमिंटपर्यंत, अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या हार्मोनल संतुलन सुधारण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, (To improve digestion), गॅसपासून मुक्त होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कार्य करतात. आपल्या आजुबाजुला अशा काही वनस्पती आहेत, ज्यांच्या पानांचा वापर करून वजन सहजपणे कमी करता येते.

अजमोदा (ओवा) हे लठ्ठपणावर रामबाण उपाय आहे

वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अजमोदा (ओवा) एक चांगली औषधी वनस्पती असू शकते. हे एक नैसर्गिक युरीनचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, जे पाणी टिकवून ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. अजमोदा (ओवा) मध्ये देखील फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी योग्य औषधी बनते. त्यात युजेनॉल असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि हायपरग्लाइसेमियावर उपचार करण्याची क्षमता असते.

पुदिन्याची पाने वजन झपाट्याने कमी करू शकतात

हिरव्या रंगाची आणि सुगंधी पुदिन्याची पाने खाद्यपदार्थांची चव तर वाढवतातच पण त्यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की पुदिन्यात भूक कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते. भुक कमी झाली तर, साहजिकच तुमच्या शरिरात कमी कॅलरी जातात आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. पुदिना पचनास देखील मदत करते, गॅस आणि ऍसिडिटी कमी करते. चांगले पचन ही वजन कमी करण्याची प्राथमिक पायरी आहे.

हे सुद्धा वाचा

अजवाइनची पाने वजन कमी करेल

ही औषधी वनस्पती पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या बायोएक्टिव्ह संयुगेचे भांडार आहे. ही दोन्ही एन्झाईम इन्सुलिनच्या कार्यासाठी महत्त्वाची आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की अजवाइनमध्ये मधुमेह नियंत्रित करण्याची क्षमता देखील आहे. हे चयापचय दर सुधारते आणि साखर नियंत्रित करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अजवाइनमध्ये बद्धकोष्ठता कमी करण्याची क्षमता देखील आहे. यामुळे तुमचा पित्त रस वाहतो आणि त्यामुळे पचनास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी रोजमेरीची पाने उत्तम

रोझमेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलचे नुकसान टाळतात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. या सर्व गुणधर्मांमुळे रोझमेरी वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम औषधी वनस्पती बनते. हे अनेक चयापचय विकारांपासून तुमचे संरक्षण करण्यात देखील मदत करू शकते. रोझमेरीमध्ये असलेल्या कार्नोसिक अॅसिडमध्ये लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते.

(टीप – यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.