Paneer Vs Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक? कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या, त्यातील पोषक घटक

पनीर आहारात मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पोषण प्राप्त होते. परंतु, अनेक लोकांना अद्यापही पनीर आणि टोफू यातला फरक कळत नाही. यात नेमका काय फरक आहे आणि कोणते अधिक फायदेशीर असते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Paneer Vs Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक? कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या, त्यातील पोषक घटक
Paneer Vs TofuImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 12:01 PM

पनीर आणि टोफू दोन्हीमध्ये भरपूर पोषक असतात. पनीर आणि टोफू (Paneer and tofu) या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण काही लोक पनीर आणि टोफूला एकच मानतात, तर हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. पनीर दुधापासून बनवले जाते, तर टोफू सोयापासून बनवले (Made from soy) जाते. पनीर आणि टोफूची चवही वेगळी असते. पनीर आणि टोफूमध्ये असणारे पोषक तत्वही वेगळे असतात. जर तुम्हाला पनीर आणि टोफू सारखेच वाटत असेल तर, ते चुकीचे आहे. या दोन्हीमध्ये बराच फरक आहे. पनीर हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यात सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम (Vitamins and calcium) असतात. तर टोफू हे सोयापासून बनवले जाते. टोफूमध्ये व्हिटॅमिन बी1 आणि एमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते. टोफूमध्ये लोह देखील असते.

पनीर आणि टोफूमधील महत्वाचे फरक

  1. पनीर हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यात सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असतात. तर टोफू हे सोयापासून बनवले जाते. टोफूमध्ये व्हिटॅमिन बी1 आणि एमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते. टोफूमध्ये लोह देखील असते.
  2. पनीर ताजे आहे, ते खायला मऊ आणि दिसायला लागते. पनीर अनेकदा पार्ट्यांमध्ये बनवले जाते. टोफू हेल्दी आहे, पण पनीरपेक्षा कमी मऊ आहे.
  3. पनीर आणि टोफूची चवही वेगळी असते. टोफूला सोया दही किंवा बीन दही असेही म्हणतात. ते चवीला हलके आंबट असते.
  4. पनीरमध्ये फॅट जास्त असते, तर टोफूमध्ये फॅट कमी असते. त्यामुळे वजन कमी करू पाहणाऱ्यांनी पनीरऐवजी टोफूचे सेवन करावे. टोफूमध्ये कॉटेज चीजपेक्षा जास्त प्रथिने असतात.
  5. पनीर जनावरांच्या दुधापासून बनवले जाते. तर टोफूमध्ये कोणतेही पुश आधारित घटक नसतात.

पनीर आणि टोफूमधील पोषक घटक

पनीर आणि टोफू हे दोन्ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. शाकाहारी लोक पनीर आणि टोफू दोन्ही घेऊ शकतात. पनीर आणि टोफूमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त इतर पोषक घटक देखील आढळतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 321 कॅलरीज असतात, तर टोफूमध्ये 144 कॅलरीज असतात.

  1. पनीरमध्ये 25 ग्रॅम प्रथिने असतात, टोफूमध्ये 17.3 ग्रॅम प्रथिने आढळतात.
  2. पनीरमध्ये टोफूपेक्षा जास्त फॅट असते. पनीरमध्ये 25 ग्रॅम फॅट असते, तर टोफूमध्ये 8.7 ग्रॅम फॅट असते.
  3. टोफूमध्ये 2.7 ग्रॅम कर्बोदके असतात, तर पनीरमध्ये 3.57 ग्रॅम कर्बोदके असतात. कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला ऊर्जा मिळते.
  4. टोफू आणि पनीर हे दोन्ही कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. कॅल्शियम हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पण टोफूमध्ये पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम असते.

दिसायला अगदी सारखे पण तरीही वेगळे

जरी पनीर आणि टोफू सारखे दिसत असले तरी दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत. पनीर दुधापासून बनवले जाते, तर टोफू सोयापासून बनवले जाते. हे दोन्ही प्रथिने आणि कॅल्शियमचे खूप चांगले शाकाहारी स्त्रोत आहेत. पनीर आणि टोफू दोन्ही आरोग्यदायी असले तरी पनीरमध्ये कॅलरीज जास्त असतात. अशा परिस्थितीत वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी टोफू हा एक चांगला पर्याय आहे. वजन वाढवणारे पनीर चे सेवन करू शकतात.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.