Health care | बीएमआयवरून आता स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन होणार…

आपण स्‍नायू हा शब्‍द आपल्‍या दैनंदिन संवादांमध्‍ये क्‍वचितच वापरतो. पण आरोग्‍यामधील हा महत्त्वपूर्ण घटक आहे, जेथे स्‍नायू हालचाल व संतुलन, शक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती व जखम लवकर बरे करण्‍यामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

Health care | बीएमआयवरून आता स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन होणार...
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:00 AM

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) व्यक्‍तीची एकूण आरोग्य (Health) स्थिती निर्धारित करण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जात आहे. वजन ते उंचीच्‍या गुणोत्तराचे सोपे समीकरण वापरून लोकांचे कमी वजन, निरोगी वजन, जास्त वजन (Weight) किंवा लठ्ठ असे वर्गीकरण केले जाऊ शकते. पण संशोधनामधून निदर्शनास येते की, हे एकमेव मापन स्‍वत:हून आरोग्‍याचे सर्वोत्तम सूचक असू शकत नाही. आपण खरोखर आरोग्‍यदायी आहोत की नाही हे कसे ठरवायचे? आरोग्‍याचे योग्‍यरित्‍या मापन केले जाण्‍याच्‍या खात्रीसाठी खाली काही महिती (Information) देण्‍यात आली आहे.

बीएमआय मोठ्या प्रमाणावर का वापरले जाते?

सहजपणे उपलब्ध होणारी ऑनलाइन बीएमआय साधने आणि सुलभ पद्धतीमुळे बीएमआय हे सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या आरोग्य निर्देशकांपैकी एक आहे. लठ्ठपणाच्या पातळ्यांचे मूल्यांकन करण्यामधील बीएमआयच्या परिणामकारकतेमुळे ही पद्धत व्‍यक्‍तीच्‍या आरोग्याची पातळी निर्धारित करण्‍यासाठी सुलभ व परवडणारी आहे. संशोधन साधन म्हणून बीएमआय वय, लिंग, लोकसंख्याशास्‍त्र आणि स्‍थानानुसार व्‍यक्‍तींचे फॅट मासवर (चरबी प्रमाण) आधारित मुलभूत विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात मदत करते. पण या एकमेव व्‍हेरिएबलवर आधारित व्‍यक्‍तींचे वर्गीकरण करताना आरोग्‍य स्थिती निर्धारित करण्‍यामध्‍ये मर्यादा दिसून येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

बीएमआय व्‍यतिरिक्‍त इतर पर्यायाचा शोध घेण्‍याची गरज

समान बीएमआय असलेल्या व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यांच्‍या पातळ्या विभिन्‍न असू शकतात, बीएमआय शरीराच्‍या रचनेला लागू नाही किंवा स्‍नायू व चरबीचे गुणोत्तर घेत नाही. उदाहरणार्थ, अॅथलीट्सच्‍या स्‍नायूंच्या वजनामुळे त्यांचा बीएमआय नेहमीच जास्त असतो. हा फरक व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍याची स्थिती निर्धारित करण्‍यासाठी नवीन तंत्रे विकसित करण्‍याच्‍या महत्त्वाला प्रकाशझोतात आणतो.

आरोग्‍याच्‍या मापनासाठी साधन म्‍हणून स्‍नायूशक्‍ती

आपण स्‍नायू हा शब्‍द आपल्‍या दैनंदिन संवादांमध्‍ये क्‍वचितच वापरतो. पण आरोग्‍यामधील हा महत्त्वपूर्ण घटक आहे, जेथे स्‍नायू हालचाल व संतुलन, शक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती व जखम लवकर बरे करण्‍यामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मेदांता गुरगाव येथील गॅस्‍ट्रोइन्‍टेस्‍टाइनल सर्जरी विभागाचे अध्‍यक्ष डॉ. आदर्श चौधरी म्‍हणाले, ”आरोग्‍याचे मापन करताना आपण वर्तणूकीपेक्षा अनियंत्रित आकडेवारीवर भर देतो. उदाहरणार्थ, तुम्‍ही आरोग्‍यदायी व तंदुरूस्‍त दिसत असला तरी स्‍नायूशक्‍ती कमकुवत असेल तर तुम्‍हाला हातांचा वापर केल्‍याशिवाय किंवा काही आधार घेतल्‍याशिवाय खुर्चीमधून उठणे अवघड जाऊ शकते. हालचालीसाठी, तसेच चयापचयासाठी स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. वयाची 40शी गाठल्‍यानंतर दरवर्षाला तुमची स्‍नायूशक्‍ती आठ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. म्‍हणून स्‍नायू महत्त्वाचे आहेत आणि ते जीवनाच्‍या दर्जाशी संलग्‍न असल्‍यामुळे आरोग्‍य स्थितीचे उत्तम सूचक ठरू शकतात.”

गेट स्‍पीड टेस्‍ट (चालण्‍याच्‍या गतीची चाचणी)

एमआरआय, डेक्सा स्कॅन्‍स आणि पोर्टेबल अल्ट्रासाऊंडसह व्‍यक्‍तीच्‍या स्‍नायूशक्‍तीचे मापन करण्‍याच्‍या अनेक पद्धती आहेत. तरीदेखील गेट स्‍पीड म्‍हणून प्रसिद्ध व्‍यक्‍तीच्‍या चालण्‍याच्‍या गतीचे मापन करणारी पद्धत डॉक्‍टरांना काही माहिती देऊ शकते. संशोधनामधून निदर्शनास येते की, गेट स्‍पीड चाचणी नकारात्‍मक आरोग्‍य निष्‍पत्तींचा अंदाज करण्‍यास मदत करू शकते आणि वृद्धांमधील आयुष्‍याच्‍या अपेक्षांशी संलग्‍न राहिली आहे. लहान अंतरापर्यंत चालण्‍याच्‍या गतीचे मापन करण्‍यासाठी ही चाचणी आरोग्‍य स्थितीबाबत माहिती मिळवण्‍याची प्रभावी पद्धत ठरू शकते. चेअर चॅलेंज टेस्‍ट ही देखील स्‍नायूशक्‍ती तपासण्‍याची सुलभ पद्धत आहे. अंदाजे 43 सेमी उंची असलेल्‍या खुर्चीवर 5 सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणरा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ 40 ते 50 वर्षे वय असलेल्‍या पुरूषांना ही चाचणी करण्‍यास जवळपास 6.8 ते 7.5 सेकंद वेळ लागू शकतो आणि महिलांना ही चाचणी करण्‍यासाठी 6.9 ते 7.4 सेकंद वेळ लागू शकतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.