Hair Fall : बांधून ठेवायचे की मोकळे सोडायचे?, बया.. केस का तुटतात? ; वाचा तर खरं..
केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. केसांबाबत निष्काळजीपणा केला तर ते तुटू लागतात आणि निर्जीव होतात.
Hair Care Tips : आपण आपल्या त्वचेची जेवढी काळजी घेतो, तेवढीच निगा केसांचीही (hair care) राखली पाहिजे. फक्त शांपूने केस धुतले की काम झाले असं नाही. केसांना निरोगी (healthy hair) बनवायचे असेल तर त्यासाठी घाम येण्यापासून वाचवणे, त्यांना नीट तेल लावणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे केस गळण्याची (hair fall problem) समस्या कमी करता येईल. नियमित काळजी घेतली तर केस मजबूत आणि सुंदर होऊ शकतात. केस बांधल्यावर की मोकळे सोडल्यावर जास्त तुटतात, असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनात असतो. चला त्याचं उत्तर जाणून घेऊया.
केस बांधून ठेवावे की मोकळे सोडावेत ?
अनेक महिलांना त्यांचे केस खुले, मोकळे ठेवायला आवडतात तर काही जणी ते बांधलेले पसंत करतात. केस उघडे ठेवल्याने तुटण्याची समस्या वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच केस बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रात्री झोपताना केस बांधून किंवा वेणी घालावी असा सल्ला दिला जातो. मात्र, केस मोकळे ठेवायचे की बांधायचे ते प्रत्येक महिलेवर अवलंबून असते. अनेक वेळा स्त्रिया तक्रार करतात की, केस मोकळे सोडून झोपल्याने सकाळी उशीवर जास्त केस दिसतात, पण बांधून झोपलं तर ते कमी तुटतात.
केस बांधल्याने काय फायदा होतो ?
केस कमी तुटतात
केस बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात. केस मोकळे सोडले तर त्यांचा कोरडेपणा वाढतो. रात्री झोपताना केस मोकळे सोडल्यास त्यातील संपूर्ण ओलावा उशीत शोषला जातो. यामुळे केस कोरडे व निर्जीव होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रत्येक ठिकाणी फक्त केसच दिसतात. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार केस बांधून झोपावे.
फ्रीझी केसांपासून होते मुक्तता
केस उघडे ठेवल्याने ते वाट्टेल तसे विखुरलेले राहतात. हे केसांमधील ओलावा कमी झाल्यामुळे होते आणि केस कोरडे होतात. कोरडे, फ्रिझी केस टाळण्यासाठी रात्री झोपताना केसांना सॅटिनचा स्कार्फ बांधावा. यामुळे केसांचे संरक्षण होते आणि सकाळी केस फ्रिझी होत नाहीत.
केसांची चमक वाढते
रात्री झोपताना केस विंचरू नयेत, असं म्हणतात पण ते सत्य नाही. उलट झोपण्यापूर्वी केस नीट विंचरले तर ते गुंतत नाहीत. आणि त्यामुळे ते कमी तुटतात. कंगव्याने केस विंचरले तर केसांना लावलेले तेल वरपासून खालपर्यंत पोहोचते. यामुळे केसांना पोषणही मिळते. त्यामुळे विंचरल्यानंतर केल्याने केस फारसे तुटत नाहीत.
केस राहतात सिल्की
रात्री झोपताना आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना नीट, हळूवार मसाज करा. यामुळे केसांना चमक येते. असे केल्याने, टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांना आवश्यक पोषक घटक मिळतात. केसातील गुंता बोटांनी हळूहळू सोडवा. बोटांनी मसाज केल्याने ताण कमी होतो तसेच केसांचे आरोग्यही सुधारते. यामुळे केस मऊ, चमकदार व रेशमी राहण्यास मदत होते. म्हणूनच केस बांधले पाहिजेत. पण ते जास्त घट्ट बांधून ठेऊ नका, थोडे सैल ठेवावेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)