बडीशेपेमुळे केसगळतीपासून बचाव, त्वचाही सुधारते; आणखी फायदे काय?

वेळेपूर्वीच केस गळायला लागणे, ही समस्या आजकाल अनेक लोकांना सतावते. यामुळे लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत केसगळती रोखण्यासाठी काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतात.

बडीशेपेमुळे केसगळतीपासून बचाव, त्वचाही सुधारते; आणखी फायदे काय?
बडीशेपेमुळे केसगळतीपासून बचाव, त्वचाही सुधारते; आणखी फायदे काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 2:19 PM

नवी दिल्ली: तुम्ही जर केसगळतीमुळे (hair fall) त्रस्त असाल, त्वचेची समस्या असेल किंवा सकाळी उठताच तुमच्या डोळ्यांना सूज येत असेल तर या सर्वांवर एक उपाय आहे. खरंतर काही घरगुती उपायांनी या सर्व समस्या दूर करता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला केवळ बडीशेपेचा (fennel seeds) वापर करावा लागेल. बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरात वापरला जाणारा किंवा मुखवास म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ नाही. बडीशेपेमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये ॲंटी-इन्फ्लामेटरी आणि ॲंटी- मायक्रोबियल गुण असतात. तसेच अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वही यामध्ये असतात. ज्यामुळे वेळेपूर्वी केस गळण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय बडीशेप ही मुरुमे आणि सुजलेले डोळे (puffy eyes) हेही बरे करते.

जाणून घ्या बडीशेप सेवन करण्याचे फायदे –

केसगळती थांबते –

आजच्या तरुण पिढीला केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे. बडीशेपमध्ये असलेले ॲंटी-ऑक्सीडेंट्स हे केसांची मुळं घट्ट करतात आणि फॉलिकल्सना पोषण देतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. केस मजबूत बनवायचे असेल तर बडीशेप पाण्यात उकळावी आणि ते पाणी थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा असे केल्यास फरक जाणवू लागेल.

मुरुमे दूर होतात –

बडीशेप ही ॲंटीसेप्टिक असते. त्यामध्ये असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे ॲक्ने किंवा मुरुमांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. हे चेहऱ्यावर लावण्यासाठी बडीशेपेच्या बियांची पावडर मधात अथवा ताकात मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी व 10-15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

हे सुद्धा वाचा

चरबी कमी होते –

बडीशेप ही नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. त्याच्या बियांमध्ये डाययूरेटिक गुण असतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्यास मदत करतात. बडीशेप पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी व जेथे अतिरिक्त चरबी आहे, तेथे लावावी. नियमितपणे हा उपाय केल्यास फरक दिसू लागेल.

चेहऱ्यावर येते चमक –

बडीशेप ही उत्तम स्क्रब म्हणून कार्य करते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. ओटमील आणि बडीशेप पाण्यात घालून ते गरम करावे आणि त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 10-15 मिनिटे ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून 2 वेळा ही क्रिया करावी. चेहऱ्यावर चमक येऊ लागेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.