बाप्पाच्या विसर्जनासाठी नवा फंडा…नाशिककरांची मोहीम आली चर्चेत…
तब्बल ११ वर्षांपासून नाशिकमधील विद्यार्थी कृती समिती "देव द्या आणि देवपण घ्या" ही मोहीम राबवत आहे.
नाशिक : गणेश विसर्जनाच्या (Ganeshvisarjan) नंतर प्रदूषणाबाबत (Godavari) आणि मूर्तीच्या विटंबनेबाबत वेगवेगळी चर्चा होत असते. ठिकठिकाणी त्याचे व्हिडिओ प्रसारित करून टीका ही केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकची तरुणाई एकत्र आलीय. तब्बल ११ वर्षांपासून नाशिकमधील (Nashik) विद्यार्थी कृती समिती “देव द्या आणि देवपण घ्या” ही मोहीम राबवत आहे. काही तासांवर गणेश विसर्जन येऊन ठेपल्याने विसर्जनाबाबत अनेकांना प्रश्न पडत असतो. बाप्पाला निरोप देतांना नागरिक अतिशय भावनिक होत असतात. त्यावेळी नाशिकमधील ही तरुणाई (Student) विशेष कार्य करत असते.
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात असे आवाहन दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही करण्यात आले आहेत.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर रासायनिक रंगकाम आणि सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. हेच प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समिती गेल्या ११ वर्षांपासून काम करत आहे.
हजारो नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमात सहभाग नोंदवत असतात. विद्यार्थी कृती समितीकडे आलेल्या मूर्ती महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत पद्धतीने विसर्जित केल्या जातात.
गोदावरीच्या जवळ असलेल्या चोपडा लॉन्सजवळ दिवसभर देव द्या देवपण घ्या उपक्रम सुरू असतो. अनेक नाशिककर या आवाहनाला ११ वर्षांपासून भरभरून पाठिंबा देत आहेत.
गेल्या ११ वर्षांपासून दरवर्षी हा उपक्रम सुरू असून दिड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा विसर्जन सोहळ्यात देखील नाशिककर सहभागी होतात. समितीचे कार्यकर्ते भाविकांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारतात.