ही तर हद्दच झाली; टॉपलेस होऊन उर्फी जावेदने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा देताना उर्फीने ओलांडल्या मर्यादा; संतप्त नेटकरी म्हणाले..

ही तर हद्दच झाली; टॉपलेस होऊन उर्फी जावेदने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 6:07 PM

मुंबई- चित्रविचित्र फॅशन आणि उर्फी जावेद (Urfi Javed) हे जणू समिकरणच बनलं आहे. अभिनेत्री उर्फी तिच्या वेगवेगळ्या फॅशनमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहते. पब्लिसिटी स्टंटसाठी ती असे कपडे परिधान करत असल्याचं काहीजण म्हणतात, तर काही तिच्या अनोख्या फॅशन (Fashion) सेन्सचं कौतुक करताना दिसतात. सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या उर्फीचा दिवाळीचा एका व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओत ती चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) देताना दिसतेय.

देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ग्लॅमरस पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. अशातच उर्फीने चक्क टॉपलेस व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या व्हिडीओमुळे तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

‘हद्दच झाली’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘अरे दिवाळीत तरी काही चांगलं कर’, असा सल्ला दुसऱ्या नेटकऱ्याने दिला. काहींनी तर उर्फीच्या अकाऊंटला रिपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. ‘दिवाळीची खिल्लीच उडवली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

“प्रत्येकाला विविध फॅशनचे कपडे घालणं, मेकअप करणं आणि सर्वोत्कृष्ट दिसणं आवडतं. मी जे काही करते, ते मी माझ्यासाठी करते. कारण चांगलं दिसणं कोणाला आवडत नाही? जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे,” असं उर्फी एका मुलाखतीत म्हणाली होती.

उर्फीचे कपडे डिझाइन करण्यासाठी तिच्याकडे एक टीम आहे. ही टीम एकत्र बसते आणि विविध डिझाइन्सवर चर्चा करते. “मला लहानपणापासून ड्रेस अपची खूप आवड आहे. मला नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. बाहेर जाण्याआधी मी माझ्या लूकची व्यवस्थित प्लॅनिंग करायचे आणि आताही मला ते करायला आवडतं. मी लहानपणापासून अशीच आहे आणि त्यात काहीही चूक नाही”, असं उर्फी म्हणाली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.