The Kerala Story | 32 हजार मुलींना ISIS ने बनवलं कैदी; अंगावर काटा आणणारा ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर

"अफगाणिस्तानच्या तुरुंगात मी एकटी नाही तर माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत. ज्यांचं धर्मांतर झालंय. त्यांना सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात दफन करण्यात आलंय. केरळमध्ये उघडपणे सर्वसामान्य मुलीला दहशतवादी बनवण्याचा भयानक खेळ सुरू आहे."

The Kerala Story | 32 हजार मुलींना ISIS ने बनवलं कैदी; अंगावर काटा आणणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर
The Kerala StoryImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:29 PM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्या मुलींची कथा दाखवण्यात आली आहे ज्यांना खरंतर नर्स व्हायचं होतं, पण त्या झाल्या ISIS च्या दहशतवादी. या हजारो मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं होतं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना मुस्लीम बनवण्यात आलं होतं. 5 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सुदिप्तो सेनने बनवलंय. तर विपुल शाह या चित्रपटाचे निर्माते आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी आणि सिद्धी इदनानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अदा शर्माचं दमदार अभिनय पहायला मिळत आहे. चित्रपटात तिने शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारली आहे. हिंदू कुटुंबातील शालिनी आता फातिमा बनली आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला शालिनीला ISIS मध्ये सहभागी होण्याविषयी काही प्रश्न विचारले जातात. ती अधिकाऱ्यांना सांगते, “मी कधी ISIS जॉईन केलं यापेक्षा हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे की मी का आणि कशी जोडले गेले?”

निष्पाप हिंदू मुलींना फसवून त्यांचा ब्रेनवॉश करून धर्मपरिवर्तन केलं जातं, याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. हिजाब घालणाऱ्या मुलींवर कधीच बलात्कार किंवा गैरवर्तन होत नाही, असं त्यांना सांगितलं जातं. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्या मुलींना ISIS दहशतवाद्यांच्या मधे आणून उभं केलं जातं. त्यानंतर या मुलींनी कधी कल्पनाही केली नसेल असा प्रवास सुरू होतो. ही कथा फक्त शालिनीचीच नाही तर तिच्यासारख्या अशा 32 हजार महिलांची आहे, ज्या केरळमधून अचानक गायब झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

“अफगाणिस्तानच्या तुरुंगात मी एकटी नाही तर माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत. ज्यांचं धर्मांतर झालंय. त्यांना सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात दफन करण्यात आलंय. केरळमध्ये उघडपणे सर्वसामान्य मुलीला दहशतवादी बनवण्याचा भयानक खेळ सुरू आहे. याला कोणी थांबवणार नाही का? ही माझी कहाणी आहे.. ही त्या 32 हजार मुलींची कहाणी आहे.. ही केरळची कहाणी आहे”, असं अदा शर्मा म्हणते.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलं होतं. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असं सांगण्यात येतं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.