Sooraj Pancholi |’बस कर भावा, रडवशील का’; सूरज पांचोलीच्या नव्या फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'बस कर भावा रडवशील का आता', असं एकाने लिहिलंय. तर 'पाप करून गंगेत स्नान केलं' असं दुसऱ्याने म्हटलंय. लवकरच तुला चित्रपटांमध्ये पहायला आवडेल, अशीही इच्छा काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

Sooraj Pancholi |'बस कर भावा, रडवशील का'; सूरज पांचोलीच्या नव्या फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
Sooraj Pancholi, Jiah Khan
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 1:23 PM

नवी दिल्ली : अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाली. तब्बल 10 वर्षांनंतर सूरजला याप्रकरणी दिलासा मिळाला. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर तो सर्वांत आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायकला पोहोचला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकंच नव्हे तर सूरजच्या कुटुंबीयांनी मिठाईसुद्धा वाटली. आता नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धिविनायकनंतर सूरज पांचोली हा दिल्लीतील गुरुद्वारा बंगला साहिब याठिकाणी पोहोचला आहे.

जिया खानने 3 जून 2013 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाच्या घरी सहा पानी सूसाइड नोट मिळाली होती. सूरज पांचोलीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असं त्या सूसाइड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सूरजला अटक केली होती. आता जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांतून विशेष सीबीआय न्यायालयाने सूरजची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने जियाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. यासाठी सूरजला जबाबदार धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.

हे सुद्धा वाचा

सूरजने बंगला साहिबच्या कुंडाजवळ हात जोडतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बस कर भावा रडवशील का आता’, असं एकाने लिहिलंय. तर ‘पाप करून गंगेत स्नान केलं’ असं दुसऱ्याने म्हटलंय. लवकरच तुला चित्रपटांमध्ये पहायला आवडेल, अशीही इच्छा काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Sooraj P (@soorajpancholi)

सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सूरजची आई जरीना वहाव यांनी सांगितलं की तब्बल 10 वर्षांनंतर त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. आता कुठे आमचं कुटुंब एक सर्वसामान्य कुटुंबासारखं राहू शकतंय, असं त्या म्हणाल्या. “अखेर आम्हाला न्याय मिळेल याच विश्वासावर आम्ही गेली दहा वर्षे काढली. अखेर आम्हाला तो न्याय मिळाला. पण मग अशा इतर आईंचं काय, ज्यांची मुलं एका अपयशी नात्यानंतर तुरुंगात डांबली गेली आहेत? मला त्यांच्यासाठी वाईट वाटतं. ज्या त्रासातून मी गेले, त्या त्रासातून कोणतीच आई जाऊ नये”, अशी प्रतिक्रिया जरीना यांनी दिली.

जिया खानची आत्महत्या ही घटना दुर्दैवी आहे. परंतु खटल्यादरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून असं दिसून येतंय की सूरजसोबतच्या त्रासदायक रिलेशनशिपमधून जिया कधीही बाहेर पडू शकली असती. मात्र तिला तसं करता आलं नाही आणि ती तिच्याच भावनांना बळी पडली. तिच्या या वर्तनासाठी सूरजला जबाबदार धरता येणार नाही, असं विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.