Sidhu Moose Wala: ‘अगला नंबर बापू का’; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याची 29 मे रोजी पंजाबमधल्या मानसा याठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता त्याच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Sidhu Moose Wala: 'अगला नंबर बापू का'; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज
सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 5:25 PM

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे (Sidhu Moose Wala) वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) यांना पाकिस्तानस्थित फोन नंबरवरून (Pakistani number) सोशल मीडियावर धमकीचा मेसेज आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ‘अगला नंबर बापू का’ असं त्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा मेसेज येताच सिद्धूच्या वडिलांना पोलिसांना त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याची 29 मे रोजी पंजाबमधल्या मानसा याठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता त्याच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

धमकी मिळाल्यानंतर सिद्धूचे आईवडील हे काही दिवसांसाठी गावाबाहेर गेले आहेत. मंगळवारी सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजच्या स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोच्या माध्यमातून मूसेवालाच्या आई-वडिलांना त्यांच्या घरी भेटून शोक व्यक्त करणाऱ्यांसाठी एक विनंती करण्यात आली. ‘सिद्धू मूसेवालाचे आईवडील काही महिन्यांसाठी गावाबाहेर गेले आहेत. जो कोणी त्यांना भेटायला येत असेल त्यांनी निराश होऊ नका. आम्ही तुम्हाला पोस्टद्वारे अपडेट करत जाऊ,’ असं त्यात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

अमृतसरच्या होशियारनगर गावात पंजाब पोलिसांसोबतच्या चकमकीत दोन गँगस्टर्सना ठार मारण्यात आलं. त्यानंतर सिद्धूचे वडील बलकौर सिंह हे आरोपींची ओळख पटविण्यासाठी अमृतसरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर बलकौर सिंह म्हणाले, “पंजाब पोलीस खूप चांगलं काम करतेय. अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. ही तर केवळ सुरुवात आहे. हा लढा खूप मोठा आहे. या गँगस्टर्सना जरी ठार मारलं तरी माझा मुलगा मला परत मिळणार नाही.” सिद्धू मूसेवालाच्या हत्याप्रकरणात सामील असलेल्या दोन गँगस्टर्सना पंजाब पोलिसांनी मारल्याचं वृत्त आहे. अमृतसरमधील एका गावात पंजाब पोलीस आणि या गँगस्टर्समध्ये तब्बल पाच तास चकमक सुरू होती. या चकमकीत तीन पोलीस आणि एक पत्रकार जखमी झाला. तर जगरुप सिंह रुपा आणि मनप्रीत सिंह उर्फ मन्नू कुसा यांना ठार मारण्यात आलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.