Pathaan | रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या ‘पठाण’ला IMDb वर मिळाली इतकी कमी रेटिंग; पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!

पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'पठाण'मुळे बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाल्याचं म्हटलं जातंय. देशभरात 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग मिळाली आहे.

Pathaan | रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'पठाण'ला IMDb वर मिळाली इतकी कमी रेटिंग; पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!
Pathaan | रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'पठाण'ला IMDb वर मिळाली इतकी कमी रेटिंगImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:59 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईची त्सुनामी आणली आहे. फक्त चित्रपट समीक्षकांकडूनच नाही तर प्रेक्षकांकडूनही ‘पठाण’ला चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या ‘पठाण’मुळे बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाल्याचं म्हटलं जातंय. देशभरात 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘पठाण’ची IMDb रेटिंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चित्रपट समीक्षकांनी ‘पठाण’ला चार आणि त्यापेक्षा अधिक स्टार्स दिले आहेत. मात्र या चित्रपटाला 7.1 IMDb रेटिंग मिळाली आहे. 30,832 युजर्सनी ही रेटिंग दिली आहे. 48.1 टक्के युजर्सनी 10 रेटिंग दिली आहे. तर 7 टक्के युजर्सनी 9 रेटिंग दिली आहे. 8.1 टक्के लोकांनी 8 आणि 29.2 टक्के लोकांनी 1 रेटिंग दिली आहे.

IMDb ची ही रेटिंग शाहरुख खानच्या चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. एकीकडे ‘पठाण’ची जोरदार कमाई सुरू असताना IMDb रेटिंगमध्ये इतकी घसरण का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा

पठाणची IMDb रेटिंग

IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

पठाण या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.