Sayali Sanjeev: ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर सायली स्पष्टच बोलली; “आम्ही बोलायचो पण..”

ऋतुराज गायकवाडला डेट करण्याच्या चर्चांवर सायली संजीवची प्रतिक्रिया; म्हणाली..

Sayali Sanjeev: ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर सायली स्पष्टच बोलली; आम्ही बोलायचो पण..
Ruturaj Gaikwad and Sayali SanjeevImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 8:53 AM

मुंबई: क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहेत. सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने कमेंट केली आणि त्यावरूनच या चर्चांना उधाण आलं. सायलीने अनेकदा या चर्चा फेटाळल्या आहेत. ऋतुराज आणि माझ्यात चांगली मैत्री आहे, असं तिने म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली सायली?

“आमच्यात काहीच सुरू नाही. या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. मित्र म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही आहोत. आमच्यात काहीच नव्हतं. आमचं एकमेकांशी नातं का जोडलं जातंय हेही मला ठाऊक नाही”, असं सायलीने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

ऋतुराजसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे खासगी आयुष्यावरही परिणाम झाल्याचं सायलीने यावेळी सांगितलं. “या अफवांमुळे माझ्या खासगी आयुष्यातही समस्या निर्माण झाल्या आहेत. ही गोष्ट अफवा पसवरणाऱ्यांना समजत नाही. तो खूप चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला आम्ही एकमेकांशी बोलायचो. जाऊ दे ना, अफवा आहेत असं म्हणून आम्ही दुर्लक्ष करायचो. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा सगळ्यांना समजेलच, असा विचार आम्ही करायचो. पण दीड वर्षानंतरही जर या अफवा पसरत असतील तर त्याचा मला त्रास होऊ लागला आहे”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली.

या मुलाखतीत सायलीने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचाही खुलासा केला. सायली संजीव सध्या सिंगल आहे. “अशा अफवांमुळे घरात चिंतेचं वातावरण निर्माण होतं. आज जर त्याच्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल मला त्याचं कौतुक करायचं असेल किंवा शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते मी करू शकत नाही. तोसुद्धा माझ्या कामाबद्दल काही बोलू शकत नाही”, असं म्हणत मैत्रीवर वाईट परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.