Samantha | समंथाने विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची हात जोडून का मागितली माफी?

समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं असून त्यावर ती उपचार घेत आहे. यादरम्यान समंथाची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

Samantha | समंथाने विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची हात जोडून का मागितली माफी?
Samantha and Vijay DeverakondaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 7:17 PM

हैदराबाद: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं असून त्यावर ती उपचार घेत आहे. यादरम्यान समंथाची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. समंथा आणि विजय एकत्र ‘खुशी’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. मात्र आजारणामुळे या चित्रपटाचं शूटिंग शेड्युल सतत पुढे ढकललं जात आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात खुशी या चित्रपटाची घोषणा झाली होती. या चित्रपटातून प्रेक्षकांना कौटुंबिक कथा अनुभवायला मिळणार असल्याचं समंथाने म्हटलं होतं. काश्मिरमध्ये या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंग पार पडलं. मात्र समंथाच्या आजारपणामुळे नंतरचं शूटिंग रखडलं. मायोसिटीसचा उपचार घेण्यासाठी समंथा काही दिवस परदेशी गेली होती. तेव्हासुद्धा तिला तिचं शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं.

हे सुद्धा वाचा

बुधवारी एका चाहत्याने ट्विटरवर समंथाला ‘खुशी’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. या चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होईल असं तिला विचारण्यात आलं. त्यावर समंथाने लिहिलं, ‘खुशीचं शूटिंग लवकरच सुरू होईल. विजय देवरकोंडाच्या चाहत्यांची मी मनापासून माफी मागते.’

समंथाच्या या माफीनंतर चाहत्यांनी तिला तिच्या तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं, ‘आधी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू खूप समजुतदार अभिनेत्री आहेस’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच समंथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने सरोगेट आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने दहा दिवसांत 33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यशोदा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान समंथा तिच्या आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.