विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन

सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं.

विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन
Salim and Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:02 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इन्विसिबल विथ अरबाज खान’ सध्या चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अरबाजचे वडील सलीम खान हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

सलीम खान यांनी मुलासमोर त्यांच्या दोन लग्नाविषयीही मोकळेपणे भाष्य केलं. सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं. विवाहित असताना दुसरं लग्न का केलं, याविषयी अखेर सलीम खान यांनी मौन सोडलं आहे.

हे सुद्धा वाचा

हेलन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अरबाजने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सलीम खान म्हणाले, “ती तरुण होती, मीसुद्धा तरूण होतो. माझा काही चुकीचा उद्देश नव्हता. मी तिच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक प्रसंग होता, जे कोणासोबतही घडलं असतं.”

वडिलांचं ऐकल्यानंतर अरबाजने स्वत:चाही अनुभव सांगितला. “या त्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी वडिलांवर नाराज होऊ शकलो असतो. ते आता माझ्या आयुष्यात घडतंय. कोणत्याही गोष्टीला समजण्यासाठी वेळ हा खूप मोठा फॅक्टर असतो”, असं अरबाज म्हणाला.

1980 च्या दशकात सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम खान यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांचं हेलनसोबतचं नातं सर्वांनीच स्वीकारलं नव्हतं. सलीम आणि हेलन यांनी अर्पिला खानला दत्तक घेतलं होतं. तर पहिल्या लग्नातून सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही त्यांची चार मुलं आहेत.

या शोमध्ये सलीम खान यांनी सलमासोबतच्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. “आम्ही आधी लपूनछपून एकमेकांशी भेटायचो. मी सलमाला जेव्हा सांगितलं की मला त्यांच्या कुटुंबीयांशी भेटायचं आहे, तेव्हा सर्वजण मला बघण्यासाठी आले होते. जणू एखाद्या प्राणीसंग्रहालयात नवी प्राणी आला असावा, त्या पद्धतीने ते मला बघत होते”, अशा शब्दांत त्यांनी मजेशीर किस्सा सांगितला.

या टीझरमध्ये अरबाज आणखी एका प्रसंगाविषयी बोलताना दिसतो. “ज्यावेळी तुम्ही विभक्त झालात, तेव्हा मला आठवतंय की माझा अपघात झाला होता. त्यावेळी तुम्ही हेलन आंटीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचा स्वीकार करणं हा मोठा मुद्दा होता. पण त्याचवेळी तुमच्या हातात कोणतंही काम नव्हतं. या सर्व प्रसंगांवर तुम्ही कशी मात केली”, असं अरबाज विचारतो. याचं उत्तर आता प्रेक्षकांना या शोच्या एपिसोडमध्येच ऐकायला मिळेल.

अरबाजच्या या नव्या शोमध्ये जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान, हेलन हेसुद्धा पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. अरबाजचा हा शो दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.