Raju Srivastava: शुद्धीवर आलेल्या राजू यांनी पत्नीशी केला बोलण्याचा प्रयत्न; तब्येतीत हळूहळू सुधारणा

दिल्लीतील जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक छातीत दुखू लागल्याने राजू खाली कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 14 दिवस ते शुद्धीवर आले नव्हते. त्यांची अँजिओप्लास्टीसुद्धा करण्यात आली.

Raju Srivastava: शुद्धीवर आलेल्या राजू यांनी पत्नीशी केला बोलण्याचा प्रयत्न; तब्येतीत हळूहळू सुधारणा
Raju Srivastava
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 3:56 PM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. शुद्धीवर आल्यापासून राजू सध्या त्यांच्या हातांची आणि पायांची हालचाल करू शकत असल्याची माहिती त्यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी दिली. 58 वर्षीय राजू यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट्स (health update) कुटुंबीयांकडून दिले जात आहेत. राजू लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.

दिल्लीतील जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक छातीत दुखू लागल्याने राजू खाली कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 14 दिवस ते शुद्धीवर आले नव्हते. त्यांची अँजिओप्लास्टीसुद्धा करण्यात आली. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत राजू यांच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स शेअर करताना अजित सक्सेना म्हणाले, “हातापायांची हालचाल होत असताना राजू यांनी पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ते स्वत: आता लवकर बरं होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.”

रुग्णालयात राजू यांना भेटण्याची परवानगी फक्त त्यांच्या पत्नीलाच देण्यात आली आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता हा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. राजू यांनी डोळे उघडून आपल्याशी संवाद साधल्याचंही शिखा यांनी सांगितलं. राजू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांची मुलगी अंतरानेही सोशल मीडियावर दिली होती.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी राजू यांची प्रकृती गंभीर असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. मात्र अशा अफवा पसरवू नका, अशी विनंती पत्नीने चाहत्यांना केली. “मी विनंती करते की कृपया अशा अफवा पसरवू नका. त्याचे परिणाम आमच्यावरही होतात. आम्हाला नकारात्मक ऊर्जा नकोय, आम्हाला सकारात्मकतेची खूप गरज आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. ते लवकरच बरे होऊन येतील”, असं त्या म्हणाल्या होत्या.

राजू श्रीवास्तव यांना ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी बाजीगर, मैने प्यार किया, आमदनी अठन्नी खर्चा रुपैया आणि बॉम्बे टू गोवा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ते उत्तर प्रदेशच्या चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.