Video | पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याच्या लेकाला करत आहे डेट? व्हिडीओ तूफान व्हायरल, चक्क मुंबईमध्ये

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. पलक तिवारी हिचे नाव बाॅलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हे अनेकदा स्पाॅट देखील झाले आहेत. आता यांचा एक नवा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Video | पलक तिवारी 'या' अभिनेत्याच्या लेकाला करत आहे डेट? व्हिडीओ तूफान व्हायरल, चक्क मुंबईमध्ये
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:35 PM

मुंबई : पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पलक तिवारी (Palak Tiwari) हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केलीये. सलमान खान याने पलक तिवारी हिला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. सलमान खान याच्या किसी का बाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटात पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. विशेष म्हणजे मुलगी पलक तिवारी हिच्या बाॅलिवूड पर्दापणासाठी आई श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहतन घेतली होती.

पलक तिवारी हिला चित्रपट मिळावा याकरिता आई श्वेताने अनेक चित्रपट निर्मात्यांच्या भेटी घेतल्या होत्या. शेवटी सलमान खान यानेच पलक तिवारी हिला बाॅलिवूडच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मात्र, प्रेक्षकांवर ज्यापद्धतीने अभिनयाची छाप पडायला हवी होती, तशी पलक तिवारी हिची पडली नाही.

फक्त पलक तिवारी हिच नाही तर सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून शहनाज गिल हिने देखील बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केलीये. आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पलक तिवारी ही पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. पलक तिवारी हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे.

इतकेच नाही तर अनेकदा हे दोघे डिनर डेटला जाताना देखील स्पाॅट होतात. मात्र, यांनी आपल्या नात्यावर अजून काहीच भाष्य केले नाहीये. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत. आता नुकताच पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे दिसत असून हे चित्रपट बघण्यासाठी गेले होते. बांद्रा येथील थिएटरबाहेर पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे स्पाॅट झाले. यावेळी पलक तिवारी हिचा लूक अत्यंत जबरदस्त असा दिसत होता. यावेळी पलक तिवारी ही पापाराझी यांना पाहून पोझ देताना देखील दिसली. विशेष म्हणजे थिएटरमध्ये अगोदर पलक तिवारी ही गेली आणि तिच्या मागून काही मिनिटाने आतामध्ये इब्राहिम अली खान हा जाताना दिसला.

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांचे व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. चाहत्यांना ही जोडी प्रचंड आवडते. काही दिवसांपूर्वी पलक तिवारी हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिला इब्राहिम अली खान याच्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी इब्राहिम अली खान आणि मी फार काही चांगले मित्र नसल्याचे सांगताना पलक दिसली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.