‘समांतर’चे निर्माते, रवी जाधव आणि क्षितिज पटवर्धन यांची नवी वेब सीरिज; हिंदीतल्या मोठ्या कलाकारांची लागणार वर्णी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav), प्रसिद्ध नाटककार, गीतकार, थिएटर दिग्दर्शक आणि पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) आणि GSEAMS चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार दिसत आहेत.

'समांतर'चे निर्माते, रवी जाधव आणि क्षितिज पटवर्धन यांची नवी वेब सीरिज; हिंदीतल्या मोठ्या कलाकारांची लागणार वर्णी
या वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं असून क्षितिज पटवर्धन यांनी कथा लिहिली आहे.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 5:37 PM

मनोरंजन क्षेत्रातील चार दिग्गजांच्या ग्रुप फोटोवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav), प्रसिद्ध नाटककार, गीतकार, थिएटर दिग्दर्शक आणि पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) आणि GSEAMS चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार दिसत आहेत. GSEAMS ने एक हिंदी वेब सीरिज (Web Series) करत असल्याचं जाहीर केलं आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं असून क्षितिज पटवर्धन यांनी कथा लिहिली आहे. रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या दोन उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे बालक पालक, टाइमपास, न्यूड हे काही लोकप्रिय आणि सर्वत्र कौतुक झालेले चित्रपट आहेत.

क्षितिज पटवर्धन हा पटकथालेखक, नाट्यदिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार आहे. त्याला 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2019 मध्ये प्रतिष्ठित तरुण तेजंकित पुरस्कार मिळालेला आहे. क्षितिजला महाराष्ट्र राज्याचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अतुलनीय योगदानाबद्दल राज्य पुरस्कार, झी गौरव, मिफ्ता आणि स्टार प्रवाह रत्न यांसारख्या पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आलेलं आहे. क्षितिजला चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात प्रतिभावान लेखकांपैकी एक मानलं जातं. टाईमपास, टाइम प्लीज, आघात, वाय झेड, क्लासमेट्स या चित्रपटांसाठी त्याने लेखन केलं आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

नवीन वेब सीरिजला चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान कलाकारांमुळे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा असल्याचं GSEAMS चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशंकदार म्हणाले. GSEAMS हे मनोरंजन उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. मोगरा फुलाला, बोनस, फुगे, अर्जुन यांसारखे मराठी चित्रपट दिल्यानंतर GSEAMS वेब सीरिजकडे वळली आहे. GSEAMS ने कोविड-19 महामारीदरम्यान वेब सीरिजच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला. GSEAMS द्वारा निर्मित नक्षलबारी आणि समांतर 1 आणि 2 ओटीटीवरील प्रेक्षकांमध्ये प्रचंड यशस्वी ठरले आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.