National Cinema Day निमित्ताने 75 रुपयांत बघू शकतात ‘हा’ चित्रपट
या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले असून त्याची कथा एका गृहिणीवर आधारित आहे. जी व्यक्तिमत्व विकाराच्या समस्येने त्रस्त आहे. तिला एका दहशतवाद्याने ओलीस ठेवले आहे आणि तिच्या पतीवर पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आर माधवन, खुशाली कुमार, अपारशक्ती खुराना आणि दर्शन कुमार (Darshan Kumar)यांचा आगामी ‘थ्रिलर धोका राऊंड डी कॉर्नर’ येत्या 23 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होते आहे. याच दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिनही (National Film Day) साजरा केला जातो.याचे निमित्त साधत प्रेक्षक अवघ्या 75 रुपयांमध्ये कुकी गुलाटीच्या(Cookie Gulati) या मनोरंजक क्राईम ड्रामाचा आनंद घेऊ शकतात. अशा चित्रपटांच्या माध्यमातून निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त एक रंजक कथा आणून चित्रपटाच्या(film) सौंदर्यात भर घातली आहे. जे प्रेक्षकांना नक्कीच स्वतःकडे आकर्षित करेल.
चित्रपट कधी प्रदर्शित होईल
या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले असून त्याची कथा एका गृहिणीवर आधारित आहे. जी व्यक्तिमत्व विकाराच्या समस्येने त्रस्त आहे. तिला एका दहशतवाद्याने ओलीस ठेवले आहे आणि तिच्या पतीवर पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर, वास्तवाला नेहमी दोन बाजू असतात, खरे काय आणि खोटे काय हे आपल्याला कळत नाही? झोका- राउंड डी कॉर्नर ही खोटी आणि कटू सत्याची कहाणी प्रतिबिंबित करते. भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारे निर्मित, खुशाली कुमार, आर माधवन, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना अभिनीत आणि कुकी गुलाटी दिग्दर्शित ‘धोखा-राउंड डी कॉर्नर’ 23 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या दिवशी सिनेमाचे सौंदर्य प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी चित्रपटाच्या निर्मात्यांना मिळणार आहे.
View this post on Instagram
23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन
याआधी 16 सप्टेंबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार होता. पण, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा प्रसिद्ध चित्रपट ब्रह्मास्त्रच्या जबरदस्त कमाईमुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 16 ऐवजी 23 सप्टेंबरला प्रेक्षकांना 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.