मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; रणांगण गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणी यांची झलक

मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचं नेतृत्व करत आहे.

मोगलमर्दिनी 'छत्रपती ताराराणी'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; रणांगण गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणी यांची झलक
Mogalmardini Chatrapati Tararani Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:28 AM

मुंबई : स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपल्या कर्तृत्वाने आधार देणाऱ्या रणरागिणी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचं गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केलं, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली. बिकट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचं उदाहरण स्थापित केलं. यासोबतच एक पुत्री, सून, पत्नी, माता तसंच राजस्त्री या भूमिकांमध्येही आदर्श प्रस्थापित केलं. अशा अष्टपैलू स्त्रीचं जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर हा चित्रपट आधारित आहे.

नुकतंच याचं शूटिंग पूर्ण झालं असून चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं आहे.

टीझरमध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचं नेतृत्व करत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, “चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाजजागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावं असं व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत.”

छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, ‘ छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचं कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.”

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” जगाच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाला तोड नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने एका महान स्त्रीची कहाणी घराघरांत पोहोचणार आहे. आजवर छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांची शौर्यगाथा फार अशी प्रकाशझोतात आलेली नाही. या निमित्ताने त्यांचं कर्तृत्व जगासमोर येईल.”

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.