Aarey Metro Car Shed: ‘एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही?’, आरेमधील मेट्रो कारशेड वादावरून सुमीत राघवनचा सवाल

एकीकडे मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी आरे वाचवाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे मेट्रो 3 चं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करावा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे.

Aarey Metro Car Shed: 'एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही?', आरेमधील मेट्रो कारशेड वादावरून सुमीत राघवनचा सवाल
Sumeet RaghvanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 12:57 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो 3’चं कारशेड आरेतच उभारण्याची (Aarey Metro Car Shed) घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी आरे वाचवाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे मेट्रो 3 चं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करावा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे. अभिनेता सुमीत राघवनने (Sumeet Raghvan) याविषयी काही ट्विट्स करत प्रश्न उपस्थित केला आहे. ‘एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही’, असा सवाल सुमीतने केला आहे. तर अभिनेता आरोह वेलणकरनेही त्याला साथ दिली आहे.

सुमीत राघवनचं ट्विट 1-

‘एक वेगळा व्हॉइस ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्लाचा (पू) आहे आणि माझी आणि माझ्याबरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई मेट्रोल 3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा कारशेडचा तर कारशेड वही बनेगा.. म्हणजे कुठे? तर आरेमध्येच,’ असं त्याने म्हटलंय.

सुमीत राघवनचं ट्विट 2-

‘देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी कळकळीची विनंती करतोय की आता याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही?,’ असा सवाल त्याने केला.

सुमीत राघवनचं ट्विट 3-

‘बस्स्स्स्स… चर्चेचा अंत. सगळ्या झाडप्रेमींना बोला, हे घ्या एक एक झाड आणि आपल्या सोसायटीमध्ये लावा. खूप झाला ड्रामा,’ असंही त्याने ट्विटरवर लिहिलंय. आज सकाळी आरेत निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थांसह सामान्यांचा प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने ते आरेत जमा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आरेतील मेट्रो कारशेडचा वाद

बहुचर्चित कुलाबा- वांद्रे – सिप्झ मेट्रो- 3चं कारशेड आरे कॉलनीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो- 3चं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचं 25 टक्के कामही पूर्ण झालं होतं. मात्र, नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होणार असल्याचं सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथं करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.