Takatak 2: ‘टकाटक 2’मध्ये पहायला मिळणार ‘हृदयी वसंत फुलताना’ गाण्याचं नवं रुप

कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं 'हृदयी वसंत फुलताना...' (Hridayi Vasant Fultana) हे 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Takatak 2: 'टकाटक 2'मध्ये पहायला मिळणार 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचं नवं रुप
'टकाटक 2'मध्ये पहायला मिळणार 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचं नवं रुपImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:22 AM

मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले आहेत. यापैकीच एक आहे ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa Banwi). या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं ‘हृदयी वसंत फुलताना…’ (Hridayi Vasant Fultana) हे ‘अशी ही बनवाबनवी’मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक 2’ (Takatak 2) या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ‘टकाटक 2’च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे.

‘टकाटक’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘टकाटक 2’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद कवडे यांचं आहे. या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याच्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे. या गाण्यात कोणकोणते कलाकार परफॉर्म करणार, गाणं कोण गाणार, संगीत कोण देणार या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. नवा साज घेऊन तयार करण्यात येणारं गाणं ‘टकाटक 2’मध्ये प्रमोशनल साँग म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंटने पॅरिस-मुख्यालय असलेल्या Believe (बीलिव्ह) डिजिटल म्युझिक कंपनीकडून ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचं रुपांतरण आणि संक्रमण अधिकार मिळवले आहेत. ज्याने भारतातील प्रतिष्ठित संगीत रेकॉर्ड लेबलांपैकी एक आणि व्हीनस वर्ल्डवाइडचा भाग असलेल्या व्हीनस म्युझिकचे अधिग्रहण केले होते. या करारामुळे 2021 मध्ये व्हीनस म्युझिकला इश्तार म्युझिक असं नाव देण्यात आलं आहे. हे गाणं इश्तार म्युझिकच्या युट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर 6 ऑगस्टपासून संगीतरसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Takatak Film (@takatakfilm)

समाजात घडणाऱ्या घटनांवर विनोदी अंगाने भाष्य करताना मनोरंजक मूल्यांची सुरेख जोड देत सुमधूर संगीतरचना सादर करण्याचा फॉर्म्युला मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक 2’मध्येही वापरला आहे. यामध्ये प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक 2’ची कथा-पटकथा लिहिली आहे. लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. 18 ऑगस्ट रोजी ‘टकाटक 2’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.