Tejasswi Prakash: ‘बिग बॉस 15’ची विजेची तेजस्वी प्रकाशचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत साकारणार भूमिका

'बिग बॉस 15'ची विजेती आणि 'नागिन' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

Tejasswi Prakash: 'बिग बॉस 15'ची विजेची तेजस्वी प्रकाशचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत साकारणार भूमिका
Tejasswi Prakash: 'बिग बॉस 15'ची विजेची तेजस्वी प्रकाशचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 8:25 AM

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही टॉकीज नेहमीच वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत ‘लोच्या झाला रे’ , ‘शेर शिवराज’, मल्याळममध्ये ‘पाथम वळवू’ असे वेगवेगळे सिनेमे आणले आहेत. तर निर्माते नितीन केणी हे ‘गदर’, ‘रुस्तम’, ‘सैराट’, ‘शेर शिवराज-स्वारी अफजलखान’ या यशस्वी सिनेमांनंतर ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) हा सिनेमा येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चंचल मनाची प्रेम कथा असं या सिनेमाबद्दल म्हणता येईल. या पोस्टरमधून बिनधास्त श्रुती (Tejasswi Prakash) आणि तिला सांभाळणारा सिद्धांत (Abhinay Berde) यांची केमिस्ट्री दिसून येत आहे.

‘बिग बॉस 15’ची विजेती आणि ‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मूळची मराठी असलेल्या तेजस्वीने ‘संस्कार -धरोहर अपनों की’, ‘स्वरागिनी- जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’, ‘बिग बॉस 15’ आणि ‘नागिन – 6’ या हिंदी मालिकांतून पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी सिनेमात दिसून येणार आहे. तेजस्वीसोबत अभिनय बेर्डेही वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. ‘ती सध्या काय करते’, ‘अशी ही आशिकी’ आणि ‘रम्पाट’नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. याचबरोबर मराठीतील अनेक नामवंत कलाकार या सिनेमात आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा सिनेमाचे पोस्टर

‘खारी बिस्कीट’ या गाजलेल्या सिनेमाचा लेखक संकेत माने यांनी या सिनेमाचे लेखन – दिग्दर्शन केले आहे. तर व्यंकट आर. अटिली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे यांनी या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे. तर यूएफओ मूव्हीज या सिनेमाचे वितरक पार्टनर आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.