Video | ब्रेकअपच्या चर्चांना पुर्णविराम, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर थेट ‘या’ ठिकाणी झाले स्पाॅट, व्हिडीओ व्हायरल
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले.
मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर यांनी आपले मार्ग वेगळे केल्याचे सांगितले जात होते. इतकेच नाही तर एका अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूर याचे नाव देखील जोडले जात होते. मुळात म्हणजे विदेशात एकटाच अर्जुन कपूर हा सुट्टी घालवताना दिसल्यापासूनच यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसल्या. मुळात म्हणजे अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासूनच मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे जवळपास गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अचानक यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्याने चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे नेहमीच एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूरचा फोटो शेअर केला होता.
ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच मलायका अरोरा हिने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओवर अर्जुन कपूर हा कमेंट देताना दिसला. यामुळे यांच्या ब्रेकअपची चर्चा फक्त अफवा असल्याचेच स्पष्ट झाले. आता नुकताच सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ मुंबईतील आहे आणि मुंबईच्या पावसामध्ये रोमांटिक वातावरणात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे थिएटरमधून बाहेर पडताना दिसले आहेत. यावेळी मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. थिएटरबाहेर पडताना मलायका अरोरा हिची काळजी घेताना अर्जुन कपूर हा दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना अशाप्रकारे एकसोबत पाहून चाहते देखील खुश झाल्याचे बघायला मिळत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले होते. याचे फोटो अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केले होते.