KGF Chapter 2: ईदच्या दिवशीही रॉकी भाईचीच जादू; अजय देवगण, टायगर श्रॉफच्या चित्रपटांना बसला फटका

14 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF: Chapter 2) या चित्रपटाला अजूनही सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. ईदच्या (Eid) दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला इतर चित्रपटांचं आव्हान असतानाही यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे.

KGF Chapter 2: ईदच्या दिवशीही रॉकी भाईचीच जादू; अजय देवगण, टायगर श्रॉफच्या चित्रपटांना बसला फटका
KGF 2Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 12:33 PM

14 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF: Chapter 2) या चित्रपटाला अजूनही सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. ईदच्या (Eid) दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला इतर चित्रपटांचं आव्हान असतानाही यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. किंबहुना इतर चित्रपटांना केजीएफ 2 चा फटका बसल्याचं पहायला मिळालं. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ईदच्या दिवशी भारतात 9 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर अजय देवगणच्या ‘रनवे 34’ने 4 कोटी आणि टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ने 2.50 कोटी रुपयांची कमाई केली. केरळमध्येही केजीएफ 2 ची चांगली कमाई होतेय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला होता.

प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1000 कोटींचा आकडा पार केला आहे. ईदच्या दिवशी केजीएफ 2 ने ‘हिरोपंती 2’ आणि ‘रनवे 34’ पेक्षाही अधिक कमाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाचं ट्विट-

या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. केजीएफ 2 हा सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘2.0’ या चित्रपटाला केजीएफ 2ने मागे टाकलं आहे. येत्या काही दिवसांत तो ‘पीके’ या चित्रपटालाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.