Johnny Depp vs Amber Heard: जगभरात गाजला जॉनी डेप-अँबर हर्डचा खटला; कशी ठरवण्यात आली नुकसान भरपाईची 116 कोटींची रक्कम?

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वी पत्नी अँबर हर्ड (Amber Heard) यांच्या खटल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर जॉनीने अँबरविरोधातील हा खटला जिंकला.

Johnny Depp vs Amber Heard: जगभरात गाजला जॉनी डेप-अँबर हर्डचा खटला; कशी ठरवण्यात आली नुकसान भरपाईची 116 कोटींची रक्कम?
Johnny Depp vs Amber Heard Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 6:29 PM

‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ (Pirates of the Caribbean) या चित्रपटामुळे जगभरात लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वी पत्नी अँबर हर्ड (Amber Heard) यांच्या खटल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर जॉनीने अँबरविरोधातील हा खटला जिंकला. अँबरने जॉनीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. तिच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं ज्युरींना आढळून आलं. जॉनी डेपला 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 116 कोटी रुपये देण्यात यावे, असे आदेश कोर्टाने अँबर हर्डला दिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जॉनीला 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 15 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. अँबरविरोधात जॉनीने आधी 50 दशलक्ष डॉलर्सचा (387 कोटी रुपयांहून अधिक) मानहानीचा दावा केला होता. तर अँबरने त्याच्याविरुद्ध 100 दशलक्ष डॉलर्सचा (775 कोटी रुपयांहून अधिक) मानहानीचा दावा केला होता. मग आता ज्युरीने अँबरसाठी 116 कोटींची आणि जॉनीसाठी 15 कोटींची रक्कम कशी निश्चित केली ते समजून घेऊयात..

नेमकं काय आहे प्रकरण?

2018 मध्ये अँबरने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक मोठा लेख लिहिला होता. अँबरने त्यात कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र लेखात तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर जॉनीने अँबरविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा लेख माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि त्यामुळे माझ्या करिअरचं नुकसान होतंय, असं त्याने म्हटलं. जॉनीने 50 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. त्याचवेळी अँबरने 100 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. याप्रकरणी कोर्टाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. जॉनी आणि अँबर 2012 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी 2015 मध्ये लग्न केलं. या दोघांचा संसार केवळ दोन वर्षंच टिकला.

हे सुद्धा वाचा

कोर्टाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल कसा दिला?

ज्युरीने याप्रकरणी अँबर आणि जॉनी या दोघांनाही मानहानीसाठी दोषी ठरवलं असताना या निकालात जॉनीचा विजय झाला असं म्हणण्यात येत आहे. “मला माझं आयुष्य परत दिल्याबद्दल धन्यवाद” अशा शब्दांत त्याने कोर्टात ज्युरीचे आभार मानले. ज्युरीने अँबरला तिन्ही मुद्द्यांमध्ये दोषी ठरवलं, तर त्यांनी जॉनीला तीनपैकी फक्त एका मुद्द्यात दोषी ठरवलं आहे.

निकालानंतर अँबरची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Amber Heard (@amberheard)

ज्युरीने असा निर्णय दिला की अँबरने केवळ जॉनीला गैरवर्तन करणारा म्हणून त्याची बदनामी केली नाही, तर तिने द्वेषाने त्याच्याविरोधात वक्तव्ये केली, जी एखाद्या सेलिब्रिटीच्या प्रकरणांमध्ये गुन्ह्याची उच्च मर्यादा मानली आहे. तिन्ही गुन्ह्यात ती दोषी आढळली. दुसरीकडे अँबरची टीम मानहानी झाल्याचे सर्व घटक सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे केवळ एका मुद्द्यावर जॉनीला दोषी ठरवण्यात आलं.

निकालानंतर जॉनीची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Johnny Depp (@johnnydepp)

मानहानीच्या दाव्याची रक्कम कशी ठरवली गेली?

अमेरिकन लिगल सिस्टिमनुसार ज्युरीला खटल्यातील तथ्ये आणि त्यांच्या स्वत: च्या विवेकबुद्धीनुसार मानहानीच्या नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्याची परवानगी आहे. अँबरच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आणि गंभीर असल्याने तिला नुकसानभरपाईची मोठी रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले. यातील 10 दशलक्ष डॉलर्स हे नुकसान भरपाई म्हणून जॉनीला मिळतील तर 5 दशलक्ष डॉलर्सचा दंड अँबर हर्डला ठोठावला आहे. असे एकूण 15 दशलक्ष डॉलर्स जॉनी डेपला मिळणार आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.