Vivek Agnihotri: ‘जर यानंतर काश्मिरी हिंदूंवर दहशतवादी हल्ला झाला तर..’; विवेक अग्निहोत्री यांचा इशारा

दहशतवाद्यांच्या हाती लागली काश्मिरी पंडितांची यादी; विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'जर एकाही हिंदूला टार्गेट केलं..'

Vivek Agnihotri: 'जर यानंतर काश्मिरी हिंदूंवर दहशतवादी हल्ला झाला तर..'; विवेक अग्निहोत्री यांचा इशारा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 9:04 AM

मुंबई: इफ्फीच्या मुख्य ज्युरींनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता पुन्हा एकदा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील ताज्या घटनेवरून त्यांनी इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘यानंतर जर काश्मीरमध्ये कोणत्याही हिंदूला टार्गेट केलं तर कोणाच्या हातावर रक्ताचे डाग असतील हे तुम्हाला माहीत आहे. हे ट्विट सेव्ह करून ठेवा’, असं ट्विट अग्निहोत्रींनी केलं. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी असल्याची टीका नदाव यांनी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये केली होती.

‘जर काश्मीरमध्ये कोणत्याही हिंदूवर निशाणा साधला गेला तर त्यासाठी कोण जबाबदार असेल हे तुम्हाला माहीत आहे’, असं ट्विट करत अग्निहोत्रींनी चार फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये नदाव लॅपिड, दुसऱ्या फोटोमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये काश्मिरी हिंदूंची एक यादी पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

‘भारतीय सरकारच्या प्लॅटफॉर्मवरून (IFFI 2022) इस्लामिक दहशतवाद्यांना खुलं वैचारिक समर्थन मिळाल्याच्या आठवड्याभरातच ‘द रेझिस्टन्स फोर्स’ने (लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची शाखा) काश्मिरी हिंदूंची यादी जारी केली, ज्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे’, असा दावा अग्निहोत्रींनी या ट्विटद्वारे केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गोव्यात पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) अध्यक्ष आणि पुरस्कार विजेते इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. “हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काहीच वाटलं नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे”, असं ते मंचावर सर्वांसमोर म्हणाले होते.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मीरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय दाखवण्यात आला आहे. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांच्या हाती लागली काश्मिरी पंडितांची यादी

काश्मीर खोऱ्यात सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या 56 काश्मिरी पंडितांची यादी लीक झाली आहे. ही यादी अतिरेक्यांच्या हाती लागली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित ब्लॉगवर ही यादी शेअर केली जात असून काश्मिरी पंडितांना धमकावलं जात असल्याचं कळतंय. याप्रकरणी भाजपने चौकशीची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.