Oscar 2023: ‘छेल्लो शो’च्या ऑस्कर एण्ट्रीला विरोध; FWICE च्या अध्यक्षांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

ऑस्करसाठी पाठवलेल्या 'छेल्लो शो'वरून वादविवाद; निर्णय बदलणार का?

Oscar 2023: 'छेल्लो शो'च्या ऑस्कर एण्ट्रीला विरोध; FWICE च्या अध्यक्षांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
Chhello ShowImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 7:33 PM

प्रसिद्ध चित्रपट निर्माते नलिन कुमार पंड्या उर्फ ​​पान नलिन यांचा ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवला गेला. मात्र या चित्रपटाला आता विरोध केला जात आहे. ऑस्करसाठी या चित्रपटाची निवड करण्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) आक्षेप घेतला आहे. ऑस्करच्या (Oscar) परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीसाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली. या स्पर्धेत RRR आणि द काश्मीर फाईल्स या चित्रपटांची चर्चा होती. मात्र ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाच्या निवडीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी हे ‘इंडियन टाइम्स’शी बोलताना म्हणाले, “हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही आणि या चित्रपटाची निवड करण्याची प्रक्रिया योग्य नाही. ‘RRR’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ यांसारखे अनेक भारतीय चित्रपट होते. पण ज्युरींनी ‘ऑस्कर’साठी परदेशी चित्रपटाची निवड केली. हा चित्रपट आता सिद्धार्थ रॉय कपूरने विकत घेतला आहे.”

FWICE च्या वतीने, बीएन तिवारी पुढे म्हणाले, “आम्हाला वाटतं की चित्रपटांची पुन्हा निवड व्हावी. त्याचप्रमाणे पॅनलवर सध्या जे ज्युरी आहेत, त्यांच्या जागी नवीन पॅनल निवडलं जावं. कारण नवीन पॅनलमध्ये असे अनेक लोक आहेत, जे अनेक वर्षांपासून या समितीमध्ये आहेत आणि त्यांनी ठरवलेले बहुतांश चित्रपट आम्ही पाहत नाही आणि या चित्रपटांवर मतदान केलं जातं. असा चित्रपट ऑस्करला गेला तर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या फिल्म इंडस्ट्रीच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो. भारतीय फिल्म इंडस्ट्री ही सर्वाधिक चित्रपट बनवते.”

हे सुद्धा वाचा

याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार असल्याचंही तिवारी यांनी पत्रकार परिषदेनंतर सांगितलं. ‘छेल्लो शो’चा वर्ल्ड प्रीमियर न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. हा चित्रपट भारतात 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

छेल्लो हा गुजराती शब्द आहे ज्याचा अर्थ शेवटचा असा होतो. छेल्लो शो म्हणजे शेवटचा शो. या चित्रपटाची कथा ही नऊ वर्षांच्या समय नावाच्या मुलाची आहे. समय हा सिनेमाच्या जादुई विश्वाकडे आकर्षित होतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.