‘गोपी बहू’च्या आंतरधर्मीय विवाहामुळे सख्खा भाऊ झाला नाराज? म्हणाला, ‘नंतर हीच लोकं..’

देवोलीनाच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल खूश नाही भाऊ? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

'गोपी बहू'च्या आंतरधर्मीय विवाहामुळे सख्खा भाऊ झाला नाराज? म्हणाला, 'नंतर हीच लोकं..'
Devoleena Bhattacharjee Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 11:06 AM

मुंबई: ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. देवोलीना नुकतीच लग्नबंधनात अडकली. जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्याशी तिने लग्न केलं. मात्र या आंतरधर्मीय लग्नामुळे तिचा सख्खा भाऊ अंदीप भट्टाचार्जी खूश नसल्याचं दिसत आहे. देवोलीनाच्या लग्नानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे देवोलीनाच्या भावाची पोस्ट?

‘स्वार्थी लोक फक्त क्षणिक सुखाचा विचार करतात. त्यांच्या मनात कोणासाठीच आदर किंवा काळजी नसते. मग त्यांना प्रश्न पडतो की त्यांची नाती अपयशी का ठरतात’, अशी पोस्ट अंदीपने लिहिली. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘स्वत:च्या जवळच्या व्यक्तीला अशा पद्धतीने सार्वजनिकरित्या बेदखल करायला हिंमत लागते. देव तुझी आणि तुझ्या पालकांची रक्षा करो’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘तुझ्या बहिणीला ब्रेनवॉश केलं गेलंय. तुझ्या भावना आम्ही समजू शकतो’, असंही दुसऱ्याने म्हटलंय. देवोलीनाच्या लग्नाला तिच्या आईने हजेरी लावली होती. मात्र तिचा भाऊ किंवा वहिनी या लग्नसमारंभात किंवा फोटोत कुठेच दिसले नाहीत.

देवोलीनाच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले, तेव्हापासून ती कोणासोबत लग्न करतेय, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. तिचा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला होता. मात्र देवोलीनाने पतीसोबतचे फोटो पोस्ट करताच त्यावरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवण्यात सुरुवात केली.

कोण आहे देवोलीनाचा पती?

देवोलीनाने जिम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केलं. घराजवळच्या जिममध्येच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. साथ निभाना साथियाच्या सेटवर जेव्हा देवोलीनाचा अपघात झाला होता, तेव्हा शहनवाजने तिची खूप साथ दिली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.